९ ते १० रुपये किलो भावाने विकावे लागत असल्याने मिरची तोडण्याची मजुरी निघत नसल्याची खंत शेतकऱ्यांनी बोलून दाखविली आहे. चौरास भाग म्हणून कोंढा परिसर तालुक्यात ओळखला जातो. परिसरात सिंचन सुविधा उपलब्ध असलेले शेतकरी मोठया प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेत असतात ,त्यांना बऱ्यापैकी रुपये यामधून मिळतात . त्यावर त्यांचे कुटुंबातील लोकांचे उदरनिर्वाह चालते ,यावर्षी हिरव्या मिरचीला सुरुवातीस ६० ते ८० रुपये भाव मिळाले कधी कधी १०० रुपये प्रति किलो भाव मिळाले. मिरची घेण्यासाठी व्यापारी शेतावर येतात किंवा भंडारा येथील भाजीपाला मंडीमध्ये न्यावी लागत असते, तेथून मिरची दिल्ली , व इतर देशात निर्यात केली जाते, सध्या दिल्ली येथे शेतकऱ्याचे कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्याचा चौरास भागातील मिरचीच्या भावावर याचा परिणाम झाला आहे,सध्या हिरवी मिरची ठोक ९ ते १० रुपये प्रति किलो या भावात व्यापारी घेत आहेत. दिल्ली किंवा परदेशात मिरची जात नसल्याने भाव पडले असे व्यापारी म्हणत असून माल घेऊन साठा करण्यास मागेपुढे पाहत आहेत, सध्या मिरची मुबंई मार्केटला पाठविली जात आहे. त्यामुळे भाव मिळत नसल्याची खंत आहे.याचा प्रभाव परिसरातील शेतकऱ्यावर पडला आहे, शेतीत मिरची तोडण्यासाठी १५० रुपये दररोज मजुरी मजुरांना दयावे लागते ते पैसे देखिल निघत नाही अशी खंत शेतकरी बोलून दाखवत आहेत ,तेव्हा उदरनिर्वाह कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे ,कोंढा कोसरा परिसरात जवळपास २०० शेतकरी मिरची लागवड करणारे आहे, तेव्हा भाव गडगडल्याने काय करावे असा प्रश्न पडला आहे, तेव्हा या प्रश्नात केंद्र सरकारने व राज्य सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना योग्य दिलासा देण्याची मागणी मिरची उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केली आहे.
कोट बॉक्स
मिरची उत्पादन करणे माझे दरवर्षी असते ,यावर्षी भाव ९ रुपये प्रति किलो पर्यत पडल्याने शेतीतील माल काढण्यास जास्त मजुरी लागते, कुटूंब कसे चालवावे धनराज रेवतकर ,शेतकरी सोमनाळा