लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : लाखनी तालुक्यातील मांगली बांध जलाशयात एक चितळ मृतावस्थेत आढळला. ही घटना शनिवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या लक्षात येताच एकच धावपळ सुरू झाली.स्थानिकांच्या मदतीने चितळाला बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्रीय अधिकारी विलास बेलखोडे, वनकर्मचारी हनुमंत मुसले उपस्थित होते.मांगली बांध हे भंडारा जिल्ह्यातील परिचित पर्यटनक्षेत्र आहे.विशाल जलाशय, उंचसखोल डोंगरे, हिरवीगार वनराई, नागमोळी रस्ते, भव्य हनुमंताचे मंदिर, वन्यप्राण्यांचा मुक्त संचार अशा विविध घटकांनी पूरीपूर्ण सजला आहे. वनाधिकाºयांच्या कटाक्ष नजरेत हा वनपरिक्षेत्र ताट मानाने उभा आहे. शनिवारला सकाळी वनकर्मचाºयांना जलाशयात चितळ मृतावस्थेत दिसला. कर्तव्यापरी जबाबदारी समजून सदर मृत चितळाला बाहेर काढून रितसर कारवाई करण्यात आली.प्रथमत: वाघाच्या भितीने चितळ जीव वाचविण्याकरिता जलाशयाचा आसरा घेतला असावा. यातच त्याचा जीव गेला असावा, असा कयास वनाधिकाºयांनी व्यक्त करण्यात आला होता. शवविच्छेदनानंतर सदर चितळाला आजार असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पर्यावरणप्रेमी उद्धव मासूरकर यांनी याबाबतची माहिती देत कर्तव्यतत्परता निभावली, हे येथे उल्लेखनीय.
मृतावस्थेत आढळला चितळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 9:56 PM
लाखनी तालुक्यातील मांगली बांध जलाशयात एक चितळ मृतावस्थेत आढळला. ही घटना शनिवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या लक्षात येताच एकच धावपळ सुरू झाली.
ठळक मुद्देआजारी असल्याचा निष्कर्ष : मांगलीबांध जलाशयातील घटना