शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

कन्हाळगावात चितळाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 10:33 PM

पवनी वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगल असलेल्या कन्हाळगाव वनक्षेत्राचे कक्ष क्र. ३२० मध्ये चितळाची शिकार करण्यात आल्याची बाब उघडकिला आली आहे. विशेष म्हणजे नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावात या चितळाचे मांस शिजविण्यात आल्यानंतर चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीला आले. शिकार प्रकरणात कन्हाळगाव येथील आठ जणांना साहित्यासह अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआठ जणांना अटक : वनविभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनी वनपरिक्षेत्रातील घनदाट जंगल असलेल्या कन्हाळगाव वनक्षेत्राचे कक्ष क्र. ३२० मध्ये चितळाची शिकार करण्यात आल्याची बाब उघडकिला आली आहे. विशेष म्हणजे नागभीड वनपरिक्षेत्रातील ब्राम्हणी गावात या चितळाचे मांस शिजविण्यात आल्यानंतर चितळाची शिकार झाल्याचे प्रकरण उघडकीला आले. शिकार प्रकरणात कन्हाळगाव येथील आठ जणांना साहित्यासह अटक करण्यात आली आहे.नागभिड वनपरिक्षेत्रात दाखल झालेल्या तक्रारीनुसार पवनी वनपरिक्षेत्रातील कन्हाळगाव येथे वनव्याप्त परिसरात शोध मोहिम राबविण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा आरोपींना अटक करुन नागभीड वनपरिक्षेत्राचे स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणात धनराज बकाराम गायकवाड, दत्तू दयाराम नागपूरकर, चंद्रहास नानाजी दिघोरे, नंदलाल दिघोरे, दिगांबर नागपूरे, गोपाल शिकरकर, रवि चाचरकर, रमेश डाहारे, सर्व रा. कन्हाळगाव यांना अटक करुन नागभिड वनक्षेत्रअधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.कन्हाळगाव वनपरिक्षेत्र कक्ष क्र. ३२० मध्ये सर्व आरोपी रात्री १.३० वाजताचे सुमारास शिकारीसाठी गेले. त्यावेळी त्यांनी बंदूकीच्या सहाय्याने चितळाची शिकार केली. यानंतर बेलाचे झाड तोडले व त्याचा लाकूड स्वयंपाक करण्यासाठी वापरला. बाम्हणी येथे साहित्य घेवून गेले. बाम्हणी येथे एकाने दारू पिण्यासाठी १०० रूपयांची मागणी केली. यावरून वाद होवून सदर चितळाच्या शिकारीचे प्रकरण वनविभागापर्यंत पोहचले.नागभिड वनपरिक्षेत्रातील अधिकारी यांनी तातडीने दखल घेवून तिघांना अटक केली. अटक झालेल्या इसमात ब्राम्हणी येथील संजय नन्नावरे व अभिमन वाकडे तर कन्हाळगाव येथील धनराज गायकवाड यांचा समावेश होता. अधिक तपास केल्यानंतर कन्हाळगाव येथील गायकवाड यांचे सोबतीला अन्य सात जण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानाही अटक करण्यात आली. शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पवनीचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. एन. बारई, नवकिशोर रेड्डी, कर्मचारी शिवणकर, नागपूरे, कांबळे, करपते, माहुरे, मरवाडे यांनी सहकार्य केले.