लोकमत संस्कार मोती स्पर्धा : गांधी विद्यालय कोंढाची विद्यार्थिनी भंडारा : ‘लोकमतच्या संस्कार मोती’ २०१५-१६ मध्ये घेण्यात आलेल्या उपक्रमात नागपूर-दिल्ली या हवाई सफरसाठी कोंढा कोसरा येथील आचल बबन जांभुळकर या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे. ती कोंढा येथील गांधी विद्यालय शाळेची विद्यार्थिनी आहे.शालेय विद्यार्थ्यांचे सुप्त गुण वाढावे यासाठी लोकमत परिवाराच्या विद्यमाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकमत संस्कार मोती सन २०१५-१६ मध्ये शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ही स्पर्धा १ जुलै ते १० आॅक्टोबर या १०० दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. यात सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांना लोकमत परिवारातर्फे बक्षीस व प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याच स्पर्धेत जिल्हानिहाय एका विद्यार्थ्याची नागपूर-दिल्ली-नागपूर या हवाई सफरसाठी निवड करण्यात येणार होती. त्या अंतर्गत हवाई सफरसाठी कोंढा येथील गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी आंचल बबन जांभुळकर हिची निवड करण्यात आली आहे. ही हवाई सफर एक दिवसाची असून ती २४ जूनला होणार आहे. या हवाई सफरसाठी आंचलला नागपूर येथून दिल्ली व परत नागपूर पर्यंत असा होणारा प्रवासाचा खर्च लोकमत परिवार उचलणार आहे. (शहर प्रतिनिधी)रेल्वे मंत्र्यांशी साधणार संवादहवाई सफरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट होणार आहे. सफरच्या दिवशी दुपारी ३ वाजता रेल्वेमंत्री प्रभू यांनी या विद्यार्थ्यांसाठी वेळ राखीव ठेवली आहे. यावेळी प्रभू हे विद्यार्थ्यांशी हितगूज साधणार असून विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन भावी आयुष्यासाठी लाभदायक ठरणार आहे.
हवाई सफरसाठी आचलची निवड
By admin | Published: June 23, 2016 12:22 AM