ठळक मुद्देमाजी आमदाराची मागणी : कोट्यवधींची झाली फसवणूक
लोकमत
न्यूज नेटवर्कभंडारा : बेरोजगार युवक युवतींना नोकरीचे आमिष दाखवून लक्षावधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या विजय रणसिंग याला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. मंगळवारी दुपारी २ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी मोठ्या संख्येने पीडित युवक युवती उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाची नोकरी लावून देण्याच्या नावावर विजय रणसिंग नामक इसमाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. विजय राजेंद्र रणसिंग असे या भामट्याचे नाव असून त्याने स्वत:ला महिला व बालविकास विभागाचा उपसचिव असल्याचे सांगितले होते. तसेच ना.पंकजा मुंडे व त्यांच्या सचिवाशी घनिष्ठ संबंध असून नोकरीत तात्काळ लावून देतो असे आमिष तो बेरोजगारांना दाखवित असे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून स्वत:चे कार्यालय स्थापन केले होते. बेरोजगारांना नोकरी संदर्भात नियुक्तीची बनावट प्रमाणपत्रे व कागदपत्रे तो तयार करून देत असे. जिल्हाधिकारी कार्यालयात तो स्वत:च्या चारचाकी वाहनाने येत होता. त्या वाहनावर शासकीय राजमुद्रा अंकीत होती. जिल्हाधिकारी कार्यालयात जातीने उपस्थित राहून विश्वास संपादन केल्यावर रणसिंग ने भंडारासह अन्य जिल्ह्यातील जवळपास २०० पेक्षा जास्त बेरोजगारांची फसवणूक केली. कुणाकडून तीन लाख तर कुणाकडून पाच ते १० लाखांपर्यंत वसुली केली. या सर्व प्रकरणात मंत्र्यांचाही हात असून जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधितांचीही चौकशी करावी अशी मागणीही नरेंद्र भोंडेकर यांनी केली.विशेष म्हणजे रणसिंग भंडारा येथे ज्या घरमालकाकडे राहायचा त्याचेही त्याने फसवणूक केली. या प्रकरणात उपप्रादेशिक परिवहन विभागाचाही समावेश असल्याने आरटीओ कार्यालयाचीही चौकशी करावी अशी मागणी होत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, जिल्हाधिकाºयांसह तत्कालीन दोषी असलेल्या अधिकाºयांवर नोंदवाा अशी मागणीही केली आहे.पत्रकार परिषदेला संजय रेहपाडे, अॅड.रवी वाढई, मुकेश थोटे यासह अन्य शिवसैनिक व पीडित बेरोजगार युवक युवती उपस्थित होते.