खोकरला ग्रामपंचायतचे दुलँक्ष
१४ लोक ०१ के
भंडारा : खोकरला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गंगानगर ते भोजापूरकडे जाणारा कालवा मार्गावरील डांबरी रस्ता पूर्ण उखडला आहे. खडीकरण झालेल्या या मार्गावर खड्डे पडले असून नागरिकच या खड्ड्यात भरण घालीत होते.
या रस्त्यावरून पायी चालणे धोकादायक झाले आहे. वाॅर्डातील लोकांच्या सामान्य रहदारीला जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे चालण्यास अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावरून रेती, गिट्टीची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी रहदारीला अडथळे होत आहेत. या रोडवरून होणाऱ्या अवैध रेती, गिट्टी ट्रक्टर वाहतुकीस कोणाचेही नियंत्रण नाही. रोज शेकडो ट्रॅक्टरवरची ये-जा होत असते. अशा रीतीने होणाऱ्या या अवैध वाहतुकीस ग्रामपंचायत, महसूल खात्याचेसुद्धा नियंत्रण नाही. या मार्गालगत प्रशांत प्राथमिक शाळा, गंगानगर खोकरला ही प्राथमिक शाळा असून लहान लहान मुलांचे या शाळेत शिकण्यासाठी रोजचे रोज ये-जा या रोडवरून सुरू असते. खड्ड्यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात लहान मुलांचे आतापर्यंत झालेले आहेत. एखादेवेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा रस्ता लोकवाहतुकीचा असल्याने पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांना खूप मोठा त्रास होत आहे.
वॉर्डाचे प्रतिनिधी ग्रामसेवक व सरपंच हा मुख्य अडथळा असल्याचे बोलून दाखवितात. हे रस्ता दुरुस्तीसाठी अडथळा निर्माण करत असल्याचे सांगितले. गंगानगर ते भोजापूर कालवा मार्गावरील खड्डे त्वरित बुझवावे व रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी गंगानगर खोकरलावासीय नागरिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.