काेराेना आजारावर लस हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने लसीकरण माेहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात नऊ लाख ६५ हजार पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत सहा लाख ६० हजार व्यक्तींनी लस घेतली आहे. त्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ५ लाख ९२९ असून, दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या एक लाख ५९ हजार ७७५ आहे. काेराेनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमुळे लसीकरणाला वेग आला असला तरी पहिली लस घेतल्यानंतर दुसऱ्या लसीसाठी पात्र असलेले नागरिक लÀत घेण्यास दिरंगाई करीत असल्याचे दिसून येत आहे.
बॉक्स
भंडारा तालुक्यात सर्वाधिक लसीकरण
जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण भंडारा तालुक्यात झाले आहे. एक लाख ६१ हजार २८४ व्यक्तीमनी लस घेतली आहे. त्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या एक लाख १८ हजार ३४७ असून, दुसरा डाेस घेणाऱ्याची संख्या ४२ हजार ९३७ आहे. लाखांदूर तालुक्यात पहिला डाेस घेणाऱ्याची संख्या ४६ हजार ९६९, दुसरा डाेस १३ हजार ५५६, लाखनी पहिला डाेस ६६ हजार ३३३, तर दुसरा डाेस २१ हजार ८५६, माेहाडी पहिला डाेस ६० हजार ४२१, दुसरा डाेस १८ हजार ५७२, पवनी पहिला डाेस ६१ हजार ५९३, तर दुसरा डाेस १८ हजार ९९९, साकाेली पहिला डाेस ६५ हजार ८६१, तर दुसरा डाेस १९ हजार ४९६ आणि तुमसर तालुक्यात पहिला डाेस ८१ हजार ३०५ आणि दुसरा डाेस २४ हजार ३५९ व्यक्तींनी घेतला आहे.
कोट
काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी तातडीने लसीकरण करणे आवश्यक आहे. पहिला डाेस घेतल्यानंतर लाभार्थ्यांनी दुसरा डाेस प्राधान्याने घ्यावा. लसीकरणाला गती मिळावी यासाठी लसीकरण केंद्रामत वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात मुबलक प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी या माेहिमेत सहभागी व्हावे.
- संदीप कदम, जिल्हाधिकारी