करडी पोलीस ठाणे हद्दीत १९ जून रोजी महसूल विभाग, पोलीस ठाणे व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना व लसीकरणाबाबत जनजागृती रुट मार्च आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
रुट मार्चमध्ये तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, सरपंच महेंद्र शेंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाजे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश तांडेकर, सहाय्यक उपनिरीक्षक शहारे, पालोरा बीट जमादार विजय सलामे, करडीचे जमादार राकेशसिंग सोलंकी, देव्हाडा बीटचे जमादार लंकेश राघोर्ते, वाहतूक शाखेचे हवालदार गौरीशंकर गौतम, नायब पोलीस शिपाई नेपाल गभणे, महेश पटले, मालाधारी, बिसने, बोंदरे व पोलीस शिपाई, होमगार्ड, महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी ठाणेदार निलेश वाजे म्हणाले, नागरिकांनी संकटाचे भान ठेवून आधीच सावध होणे काळाची गरज आहे. सार्वजनिक गर्दीचे ठिकाणी वावरताना मास्क वापरावे. लसीकरण करून सामाजिक अंतर बाळगावे. कोरोनावर समजदारी हाच प्रभावी उपाय आहे. विनाकारण गर्दीत जाणे टाळल्यास कोरोनावर प्रतिबंध लावता येईल, असे मनोगत रुट मार्च दरम्यान व्यक्त केले. करडी गावासह परिसरातील गावातून रुट मार्च काढण्यात आला. सर्वांनी शासकीय निर्णय व नियमांचे पालन करीत लसीकरण करावे, यासंदर्भात जनजागृती करण्यात आली.