उन्हाळी धानाचा शेतकरी घाबरला : शेतीकामाला मजूर टंचाई, वीज पुरवठा खंडित, पारा घसरलामुखरु बागडे । लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर (चौ.) : रोहिणी नक्षत्रापासून पावसाळा सुरु होतो. नैऋत्य मौसमी वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळत असल्याचा हवामान खात्याच्या अंदाजाने जिल्ह्यात सतत तीन दिवस पावसाने हजेरी लावली. यामुळे थोडा फार चढत्या पाऱ्याला ब्रेक आला असून शेती कामाला वेग आला आहे. मात्र मजूर टंचाईमुळे उन्हाळी धान उत्पादक प्रचंड घाबरला असून हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल होणार नाही ना अशी भीती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना खरीबाच्या तयारीत गुंतवित आहे. नर्सरी तयार करणे, बांध (धुरे) साफ करणे, झाडेझुडपे तोडणे, शेणखत शेतात टाकणे यासारखी कामे सुरु झाली आहेत. पावसावर सगळी शेतीची भिस्त असल्याने पावसाचा अंदाज घेऊनच शेतीकामे उरकविली जातात. असह्य उन्हाळ्यामुळे पाणी पातळी आटल्याने विहिर, बोअरवेल यांना पाणी नसल्याने कित्येक शेतकरी पऱ्हे घालायला घाई करणार नाही. वरुणराजाची कृपा झाल्याशिवाय जूनच्या पहिल्या आठवड्यानंतरच स्वतंत्र सिंचन साधनाचे शेतकरी पऱ्हे घालू शकण्याचा अंदाज आहे. हल्ली जिल्हाभर रोजगार हमी काम सुरु असल्याने शेती कामाला मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. शासनाने व प्रशासनाने वास्तविकतेचा अभ्यास करून रोजगार हमी योजना मार्फत आतापासूनच शेती कामे करण्याचा प्रयत्न करावा. लोकसहभागाच्या नावावर शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या फसव्या प्रयत्नापेक्षा योजना कार्यान्वित आहे. तिला फक्त मोठे रुप देत शेतीला नवा आयाम देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यायला मोठी मदत होईल.वादळवाऱ्यामुळे बांधाणातील धान जमीनदोस्त होत आहेत. धान कापणी यंत्र अशा धानावर काम करण्यास असमर्थ ठरत आहे. वीज खंडीतचे प्रमाण वाढले असून रात्रीला झोपमोड होत आहे. विजांच्या कडाडामुळे तांत्रिक बिघाड वाढत असल्याची प्रतिक्रिया महावितरणचे अधिकारी सांगत आहेत. जग झपाट्याने बदलत. मात्र महावितरणचे नवीन बदल न आणल्याने थोडासाही वारा वादळ, पाऊस आला तरी हमखास वीज १-२ तासाकरिता खंडीत होते हे विशेष. महावितरणच्या कार्यप्रणालीवर नागरिकांमध्ये रोष आहे.
मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची उडविली तारांबळ
By admin | Published: May 31, 2017 12:39 AM