कोरोनामुळे बेरोजगारी वाढली आहे. त्यामुळे अनेक जण चोरी, तसेच गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. नुकतीच ठाणा येथील ७० लाखांच्या चोरीची घटना १६ ऑगस्ट रोजी घडली. त्यामुळे अशा चोरीच्या घटना घडल्यास चोरट्यांचा तत्काळ तपास लागू शकतो व भविष्यातील चोरीच्या घटनांना आपण सीसीटीव्हीमुळे आळा घालू शकतो. अशा सीसीटीव्ही कॅमेऱ्याची किंमतही फक्त पाच हजार रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे हे कॅमेरे सहजासहजी नागरिकांना खरेदी करता येऊ शकतात. यामध्ये एक मेमरी कार्ड असते. याला स्क्रीन वगैरेची गरज नसते. जर असा कॅमेरा प्रत्येक बंगला मालकांनी बसवल्यास तो परिसर, ती कॉलनी अधिक सुरक्षितपणे राहू शकते. चोरटे हे चोरी करण्याआधी परिसरात चकरा मारतात असे संशयित चोरट्यांची माहिती तत्काळ पोलिसांनाही दिल्यास धोका टळू शकतो. याबाबत नागरिकांनी कॅमेरे घरावर बसविल्यास चोरीच्या घटनांमध्ये अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनाही मदत होऊ शकते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी आपल्या घरावर योग्य उंचीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, याबाबत भंडारा पोलीस ठाण्याकडून जनजागृती करण्यात येत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत अधिक माहिती हवी असल्यास नागरिकांनी भंडारा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन काणसे यांनी केले आहे.
कोट
सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी इच्छुक नागरिकांनी भंडारा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाशी संपर्क साधावा. त्यांना योग्य ती तांत्रिक मदत करून सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पोलिसांकडून योग्य ते सहकार्य केले जाईल.
लोकेश काणसे ठाणेदार,
भंडारा पोलीस ठाणे