शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

नागरिकांनी संविधान आत्मसात करावे

By admin | Published: February 02, 2015 11:01 PM

भारतीय संविधान हे जगातील लिखित असे अद्वितीय संविधान आहे. या संविधानातील मुलभूत हक्क व अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यसुद्धा समजणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे महत्व

भंडारा : भारतीय संविधान हे जगातील लिखित असे अद्वितीय संविधान आहे. या संविधानातील मुलभूत हक्क व अधिकारासोबत मूलभूत कर्तव्यसुद्धा समजणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाचे महत्व जाणणे ही प्रत्येक भारतीय नागरिकांची जबाबदारी असल्याचे मत संविधान बांधिलकी महोत्सवात उपस्थित मान्यवरांनी केले.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा व अ.भा. महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंच यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमुर्ती चौक येथे संविधान बांधिलकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हिवताप अधिकारी हर्षल मेश्राम हे होते. विशेष अतिथी म्हणून भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष बळीराम सार्वे, अमृत बंसोड, नरेश आंबीलकर, अ‍ॅड. संजीव गजभिये, अमृत बन्सोड, प्रा. डॉ. जयश्री सातोरकर, हिवराज उके, भैय्याजी लांबट आदी उपस्थित होते.याप्रसंगी भारतीय संविधानाची जडणघडण कशी झाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना देण्यात आलेले भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी अत्यंत सामर्थपणे कशी पार पाडली हे महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस प्रा. नरेश आंबीलकर यांनी सांगितले. पंडीत सोमाजी गायकवाड, अ‍ॅड. रामदयाल हिरकणे, अश्विनी भिवगडे, महिला अत्याचार विरोधी सामाजिक न्याय मंचाच्या अध्यक्षा राज्यलक्ष्मी पाटील, भारत मुक्ती मोर्चाचे सरयु डहाट, मअंनिसचे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे यांनी भारतीय संविधानाचे महत्व पटवून सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी हिवताप अधिकारी हर्षल मेश्राम यांनी संविधान हे सर्व ग्रंथापेक्षा जगातील उत्कृष्ठ व लोकहिताचे सर्वश्रेष्ठ असे संविधान आहे याचे नागरिकांनी काटेकोरपणे वाचन व पालन करावे तरच आपल्याला खरी लोकशाही मिळेल असे सांगितले.या प्रसंगी पॉल चर्च स्कूलचे विद्यार्थी दिव्या गायधने, पुजा बाच्छिल, यशस्वी गजभिये, साक्षी फुलसुंगे, वैशाली डहारे यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. आभार विष्णुदास लोणारे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरज परदेशी, बसपा फाये, त्रिवेणी वासनिक, राजकुमार दहेकर, मेहमुद अली, कविता लोणारे, कोठीराम पवनकर, सुजाता घेडीचोर, लक्ष्मण भोपे, रहिम तुरक, आशा गजभिये यांनी अथक सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)