लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हाकेच्या अंतरावर मुबलक पाणी असतानाही भंडारेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. रविवारी शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालाच नाही. परिणामी नागरिकांना मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागले.भंडाºयाची लोकसंख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी भंडारा नगरपालिका प्रशासनाची आहे. भविष्यकालीन वाढीव पाणी पुरवठा योजनेची कामे सुरु झाली असली तरी त्यात आम्हाला वेग यायचा आहे. नवीन योजना कार्यान्वीत व्हायला दोन वर्षांचा तरी कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत मात्र भंडारेकरांना दूषित व अल्प पाणीपुरवठा होत आहे. पर्यायी व्यवस्था करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले होते. मात्र ते नियोजनही ढासळल्याचे दिसून येते.उन्हाळ्याची चाहूल लागताच भंडारा शहरातही पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवू लागले होते. उल्लेखनीय म्हणजे नळाचे पाणी दूषित येत असल्यामुळे बहुतांश नागरिकांनी आरोचे पाणी पिणे सुरु केले आहे. गरीबांची मात्र चांगलीच फजीती होताना दिसून येते. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यात सपेशल प्रशासन फेल ठरले आहे.अड्याळमध्ये शुद्ध पाण्यासाठी भटकंतीअड्याळ येथे सर्वात जुनी व ज्वलंत समस्या ही पाण्याची ठरत आहे. गावात शुद्ध पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु असून दररोज विकत घेऊन पाणी प्यायचे काय? असा संतप्त सवाल नागरिक विचारीत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अड्याळ ग्रामस्थांना नळाद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा दूषित आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे दोन महिन्यांपासून लाखो लक्ष रुपये खर्च करून नवीन जलवाहिनी घालण्याची कामे होत आहेत. ही कामे कधी पूर्ण होणार व अड्याळवासीयांना कधी शुद्ध पाणी प्यायला मिळणार असा प्रश्न अड्याळवासी करीत आहेत. याचा सर्वात जास्त फटका महिला वर्गाला सहन करावा लागत आहे. नाईलाजास्तव नागरिकांना आरोचे पाणी विकत घेऊन प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावात शुद्ध पाण्याचा एक आरो सुद्धा काही महिन्यापूर्वी लावला होता. म्हणजेच नळातून शुद्ध पाणी मिळत नाही हे याचे उदाहरण म्हणावे लागेल.
भंडाऱ्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 12:37 AM
हाकेच्या अंतरावर मुबलक पाणी असतानाही भंडारेकरांना पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ आली आहे. रविवारी शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झालाच नाही. परिणामी नागरिकांना मिळेल त्या साधनाने पाणी आणावे लागले.
ठळक मुद्देरविवारी पाणीपुरवठा ठप्प : जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ, ठिकठिकाणी होतोय टँकरने पाणीपुरवठा