लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात दहावीची परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभाग विविध उपाययोजना करीत आहे. त्याला सहकार्य म्हणून मोहाडी तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून दहावीच्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या निगराणीत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीकडून सीसीटीव्हीची यंत्रणा कार्यान्वीत करून दिली जाणार आहे. अशापद्धतीने परीक्षा घेणारे जांभोरा हे जिल्ह्यातील एकमेव केंद्र ठरणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाने चार वर्षापुर्वी जांभोरा येथील जय संतोषी माँ विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र दिले. सरस्वती विद्यालय जांभोरा, जिल्हा परिषद विद्यालय पालोरा आणि जय संतोषी माँ विद्यालयासाठी हे परीक्षा केंद्र आहे. तीनही शाळांचे २४० विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहे. परीक्षा केंद्र मिळाल्यापासून भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेतली जात आहे. मात्र कुठलाही गैरप्रकार होवू नये म्हणून जांभोराचा सरपंच भुपेंद्र पवनकार यांनी पुढाकार घेतला. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही यंत्रणा लावून देण्याची तयारी दर्शविली. यासाठी त्यांनी शिक्षक आणि पालकांना विश्वासात घेतले. काहींनी सुरूवातीला विरोध दर्शविला. मात्र मुख्याध्यापिका सिंधु गहाने यांनी या निर्णयाचे स्वागत करून सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार आता जांभोरा येथील परीक्षा केंद्रावर सीसीटिव्हीच्या निगरानीत दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. एखाद्या सरपंचाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी पुढाकार घेण्याची ही जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील पहिली घटना असावी.परीक्षा मंडळाकडून सीसीटिव्ही कॅमेराबाबत विचारणा करण्यात आली होती. शाळा व्यवस्थापन समितीकडून कॅमेरे बसविणे विचाराधीन होते. पोलीस ठाण्याकडूनही तशी सूचना मिळाली होती. परीक्षा केंद्रावर सीसीटिव्ही लावल्यानंतर विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड कमी होईल. अभ्यास जिद्दीने करतील.-सिंधू गहाणे, मुख्याध्यापिका.कॉपीमुक्त परीक्षा व्हावी. विद्यार्थ्याानी भयमुक्त परीक्षा द्यावी यासाठी आपण पुढाकार घेतला. सीसीटिव्ही यंत्रणा आपण कार्यान्वित करून देणार आहोत. विद्यार्थ्यांनी जिद्दीने अभ्यास करावा आणि उत्तम गुण मिळावे ही त्यामागची भूमिका आहे. परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील.-भूपेंद्र पवनकार, सरपंच जांभोरा.
सीसीटिव्हीच्या निगराणीत दहावीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 6:00 AM
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागाने चार वर्षापुर्वी जांभोरा येथील जय संतोषी माँ विद्यालयाला दहावीचे परीक्षा केंद्र दिले. सरस्वती विद्यालय जांभोरा, जिल्हा परिषद विद्यालय पालोरा आणि जय संतोषी माँ विद्यालयासाठी हे परीक्षा केंद्र आहे. तीनही शाळांचे २४० विद्यार्थी यावर्षी परीक्षा देणार आहे.
ठळक मुद्देजांभोरातील उपक्रम : ग्रामपंचायत देणार यंत्रणा उपलब्ध करून, जिल्ह्यातील पहिले केंद्र