लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रक व ट्रेलर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे घडली. पप्पू कुमार रंजवाल (२४) रा.मरार (झारखंड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले.इंद्रजीत राजूप्रसाद शाहू (२७) रा.रामगड (झारखंड), मोहम्मद नौशाद उर्फ नूरमहोम्मद शेख (३२) रा.दरभंगा (बिहार) व महोम्मद इसराईल मोहम्मद गुलजार (२६) रा.मधुबनी (बिहार) असे जखमींची नावे आहेत. जखमींवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील जवळपास तीन तास वाहतूक ठप्प होती. याचा अनेकांना फटका बसला. नागपूरवरून येणाऱ्या वाहनांना शहापूर-हत्तीडोई मार्गे वळविण्यात आले होते. तर साकोली ते भंडाराकडे येणाºया प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.रायपूर येथून नागपूर येथे सुपारीचे पोते घेऊन जाणारा ट्रक क्रमांक डब्लूबी ११ डी ४६८६ हा जात असताना त्याचवेळी नागपूरकडे जाणारा १४ चाकी ट्रेलर क्रमांक आरजे १९ जीडी ०७७१ ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक सीजी ०४ एचव्ही ७११३ याला धडक दिली. परिणामी मागे असलेल्या ट्रेलरनेही दोन्ही ट्रकांना जाऊन टक्कर दिली. या अपघातात सीजी ०४ एचव्ही ७११३ मधील क्लिनर पप्पूकुमार रंजवाल हा फसल्या गेल्याने तसेच गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. ट्रेलरमध्ये दोन इसम प्रवास करीत होते. मात्र त्यांना कुठलीही इजा झालेली नाही. या प्रकरणी विरमाराम मेघवाल रा.शिवनगर जिल्हा बाडमेर यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. तपास पीएसआय रुपाली फटींग करीत आहे
ओव्हरटेकच्या नादात क्लिनरचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 10:27 PM
ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या दोन ट्रक व ट्रेलर यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात क्लिनरचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील भिलेवाडा येथे घडली. पप्पू कुमार रंजवाल (२४) रा.मरार (झारखंड) असे मृताचे नाव आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले.
ठळक मुद्देतीन ट्रकचा अपघात : भिलेवाडा येथील घटना