शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सामान्य रूग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा

By admin | Published: March 31, 2017 12:32 AM

गरिबांसह सर्वसामान्यांचा दवाखाना म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा वाजला आहे.

घाणीच्या विळख्यात नळ : जागोजागी अस्वच्छता, पाण्याची समस्या बिकट, रूग्णालयाला राज्यस्तरावरील पारितोषिकभंडारा : गरिबांसह सर्वसामान्यांचा दवाखाना म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा वाजला आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेल्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता व घाण पसरलेली आहे. त्याच ठिकाणातून रूग्णांच्या नातेवाईकांना पिण्याचे पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.भटके विमुक्त विकास परिषदेच्या पदाधिकारी एका रूग्णाला पाहण्यासाठी बुधवारला रात्री जिल्हा सामान्य रूग्णालयात गेले असता त्यांना रूग्णाच्या नातेवाईकाला पिण्याचे पाण्यासाठी रूग्णालय परिसरात फिरावे लागले. त्यानंतर गुरूवारला सकाळी पुन्हा भेट दिली असता या रूग्णालय परिसरात केवळ एक नळ आहे. तिथेच रूग्ण व त्यांचे नातेवाईक पिण्याचे पाणी घेत असल्याचे दिसून आले. रूग्णालय परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी ज्याठिकाणी हे नळ आहे, त्या परिसरातील पाणी प्यावे तरी कसे? असा प्रश्न येतो. अस्वच्छतेमुळे आरोग्य सुधारण्याऐवजी आणखी बिघडण्याची भीती आहे. याच परिसरात जेवनानंतर उरलेले अन्न जमा करण्यासाठी असलेल्या पात्राची स्वचछता होत नसल्यामुळे तिथून दुर्गंधी सुटलेली आहे. शासन सामान्य रूग्णालयात रूग्णांसाठी विविध योजना राबविते. त्यासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी येतो. परंतु स्वच्छता व पिण्याच्या पाण्यासाठी किती कोटींचा निधी खर्च करण्यात आला, निधी खर्च झाला असेल तर रूग्णांना सुविधा मिळाल्या का? असा प्रश्न करून सामान्य जनतेने नालीवरच्या पाण्यावर तहान भागवायची का? असा प्रश्नही अखिल भारतीय भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष उकंडा वडस्कर, कोषाधाक्ष साजन वाघमारे यांनी केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)