जिल्हा परिषद येथे आज वित्त विभागात येथील अधिकारी व कर्मचाºयांनी स्वच्छता अभियान राबविले. दुपारी ४ वाजताच्या सुमारास कार्यालयीन कामे उरकून या कर्मचाºयांनी त्यांचे कपाट, टेबल व त्यांतील ड्रॉवर, खुर्च्या, भिंतीवरील जाळया साफ केल्या. यासाठी अधिकारी व कर्मचाºयांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. वित्त विभागातील कर्मचाºयांच्या स्वयंस्फुर्तीची दखल जिल्हा परिषदच्या अन्य विभाग प्रमुखांनी घेतली असून त्यांचे विभाग स्वच्छ ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
स्वच्छता कार्यालयाची :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:39 PM