लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद यात्रेचे आयोजन केले आहे. २ आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या या मोहिमेत ७० च्यावर गावात जाऊन हि मोहीम लोकात पोहचवली असून यासाठी त्यांनी जवळपास १५० किमीचा प्रवास पायी केला आहे.रविवारी स्वच्छता संवाद पदयात्रेचे वरठी येथे आगमन झाले. सकाळी १० वाजे पासून दुपारी १ वाजेपर्यंत वरठी येथे हि पदयात्रा फिरत होती. यावेळी आमदार चरण वाघमारे, माजी सरपंच निरंजना साठवणे, पंचायत समिती सदस्य पुष्पां भुरे, मोहाडी पंचायत समितीच्या सभापती निशा बांडेबुचे, माजी उपसभापती विलास गोबाडे, माजी सभापती हरिश्चंद्र बंधाटे, माजी पंचायत समिती सदस्य रवी येळणे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप उके, ग्राम पंचायत सदस्य संदीप बोन्द्रे, शुभांगी येळणे, रवी लांजेवार, श्वेता नारनवरे, सुजाता भाजीपाले, वंदना वंजारी, बाबू ठवकर, अनिल राऊत, एकनाथ बांगरे, घनश्याम बोन्द्रे, अश्विन वासनिक व विद्या भिवगडे उपस्थित होते. दुपारनंतर यात्रा आपल्या पुढील प्रवासाला निघाली. दरम्यान यात्रेतील सहभागी कार्यकर्त्यांचा उत्साह जोमात दिसला. वरठीचा एक एक भागात हि संवाद यात्रा फिरली व स्वच्छतेचे संदेश व प्रत्येक्ष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.स्वच्छता ही संकल्पना माणसाच्या दैनंदिन जीवनाशी जुडून आहे. स्वत:चे घराबरोबर परिसर स्वच्छ असल्याखेरीज माणसाचे आरोग्य सदृढ राहू शकत नाही. प्रत्येक मनुष्य हा वयक्तिक स्वच्छेतेवर लक्ष ठेवून असतो. पण या भानगडीत परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती पासून स्वच्छता संवाद यात्रा सुरु करण्यात आली आहे. दर रविवारी मोहाडी व तुमसर तालुक्यात हि मोहीम राबवण्यात येणार आहे. आज वरठी जिल्हा परिषद क्षेत्रातील वरठी, एकलारी, बोथली-पांजरा, मोहगाव, दहेगाव, बेटाळा, रोहा इत्यादी गावात ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी आमदार चरण वाघमारे हे स्वत: हातात झाडू आणि स्वच्छता मोहीम याबद्दल माहिती देणारे पत्र घेऊन फिरत होते. गावातील कचरा व घाण झाडून काढून नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसले. स्वच्छता हि सवार्ना पाहिजे पण यासाठी पुढाकार घेणाºयाची खरी गरज आहे.स्वच्छता संवाद यात्रा हे जागरूकतेची प्रभावी माध्यम असून संवादाचे शस्त्र असल्याचे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले.
स्वच्छता यात्रा ठरली सवांदाचे माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:02 PM
घरासमोर घाण नसावी हे प्रत्येकाला वाटते. पण दुसऱ्याच्या घरासमोर किंवा परिसरात आपणच घाण पसरवतो याचा विसर पडताना दिसते. स्वच्छता मोहीम ही सार्वजनिक व्हावी व प्रत्येकाने जबाबदारी समजून या मोहिमेत सहभाग घ्यावा म्हणून आमदार चरण वाघमारे यांनी स्वच्छता संवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
ठळक मुद्दे१५० कि.मी.चा प्रवास : चरण वाघमारे यांचा पुढाकार, मोहाडी-तुमसर तालुक्यात उपक्रम