लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सुशिक्षित बेरोजगार संस्थेमार्फत राबविण्यात येणाºया विद्युत पथदिवे व विद्युत यंत्रणांची तक्रार मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे करणार आणि मासिक देखरेख बील वेळेवर काढून देण्यासाठी संस्थेला मिळालेल्या एकूण बिलामधून पाच टक्क्यानुसार १०,५०० रूपयांची लाच घेताना नगरपरिषदेचे कनिष्ठ लिपिक गणेश ओमकार मेहर याला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी केली.गणेश मेहर हा तुमसर नगर परिषदेत विद्युत व आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत आहे. तक्रारदारांची आर्थिक सुशिक्षित बेरोजगार नामक संस्था आहे. या संस्थेला तुमसर नगर परिषदेमार्फत दरमहा १ लाख ६९ हजार रूपये तुमसर शहरातील विद्युत दिवे व देखभालीसाठी मिळतात. माहे जुलै महिन्याचे ९२ हजार व आॅगस्ट महिन्याचे १ लाख १८ हजार असे एकूण २ लाख १० हजार रूपयांचे बील संस्थेच्या खात्यावर २१ आॅक्टोबर रोजी जमा झाले.गणेश मेहर याने संबंधित विद्युत पथदिवे व विद्युत यंत्रणांची तक्रार मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे करेन, असे सांगून यापुढे मासिक देखरेख बील वेळेवर काढून देण्यासाठी आणि संस्थेची वरिष्ठांकडे तक्रार न करण्यासाठी मिळालेल्या बिलातून पाच टक्के याप्रमाणे १०,५०० रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणाची सदर संस्थेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानंतर या विभागाने शहानिशा केल्यानंतर मंगळवारला सापळा पडताळणी दरम्यान कनिष्ठ लिपिक गणेश मेहर याने तक्रारकर्त्याला १० हजार ५०० रूपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर २४ आॅक्टोबरला गणेश मेहर याने १०,५०० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये कलम ७,१३ (१) (ड ) सहकलम १३ (२) तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूरचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात व भंडाराचे पोलीस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या नेतृत्त्वात पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सचिन हलमारे, अश्विन गोस्वामी, पराग राऊत, श्रीकांत हत्तीमारे, शेखर देशकर, दिनेश धार्मिक यांनी केली.
१० हजारांची लाच घेताना लिपिक जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:07 AM
सुशिक्षित बेरोजगार संस्थेमार्फत राबविण्यात येणाºया विद्युत पथदिवे व विद्युत यंत्रणांची तक्रार मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे करणार आणि मासिक देखरेख बील वेळेवर काढून देण्यासाठी संस्थेला .....
ठळक मुद्देतुमसर येथील घटना : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई