दुसरीकडे सार्वजनिक आराेग्य विभागात फेब्रुवारी २०१९ मध्ये जाहिरात आली हाेती. निवडणूक व काेराेनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर पडल्या. मात्र, त्यानंतर मूळ जाहिरातीच्या ५० टक्के जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक आराेग्य विभागाची परीक्षा २८ फेब्रुवारी राेजी झाली. मूळ जाहिरातीमधील ५० टक्के पदांना नियुक्ती देण्यात आली; परंतु उर्वरित ५० टक्के जागांबाबत काेणत्याच हालचाली दिसत नाहीत. आता विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. या जागा भरल्या नाहीत तर तीव्र आंदाेलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
बाॅक्स
काय आहे विद्यार्थ्यांचे म्हणणे
मूळ जाहिरातीलमधील जागांनुसार आम्ही मेरिटमध्ये आहाेत. ५० टक्के पदभरतीच्या नावाखाली आमचा हक्क डावलला जात आहे. शासनाने लवकर नियुक्त्या दिल्या नाहीत तर पुन्हा एकदा स्वप्नील लाेणकरसारखी घटना महाराष्ट्रात घडेल. त्यासाठी शासनाने तत्काळ नियुक्त्या द्याव्यात, असे विद्यार्थी म्हणत आहेत.
बाॅक्स
आराेग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समितीचा इशारा
आराेग्य विभागातील उर्वरित ५० टक्के जागा भरल्या नाहीत, तर तीव्र आंदाेलन करण्याचा इशारा आराेग्य विभाग मेरिट विद्यार्थी कृती समितीने दिला आहे. समन्वयक किशाेर खेडकर, जगदीश पाटील, वृषाली सुन्नेवार यांनी याबाबत शासनाला निवेदन पाठविले आहे.