बॉक्स
नगर परिषदेच्या तीन कर्मचाऱ्यांना दंड
विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मंगळवारी नगर परिषदेच्या कार्यालयातच तीन कर्मचारी विना मास्क असल्याचे दिसून आले. त्या तिघांना प्रत्येकी १५० रुपये दंड आणि कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. नगर परिषदेने या कर्मचाऱ्यांना दंड देऊन नागरिकांना एकप्रकारे मास्क घालण्याची सूचनाच दिली. या कारवाईने नगर परिषद वर्तुळात काही काळ खळबळ उडाली होती.
बॉक्स
शहरात सात ठिकाणी चेकपोस्ट
विनाकारण रस्त्यावर भटकंती करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी शहरातील मुख्य सात चौकात नगर परिषद चेकपोस्ट उभारणार आहे. त्या ठिकाणी शहरात फिरणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. शहरातील त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव चौक, गांधी चौक आणि शास्त्री चौकात चेकपोस्ट उभारले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी दिली. तसेच शहरातील सर्व आस्थापनामधील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के कोरोना टेस्ट करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे, विनाकारण कुणीही रस्त्यावर भटकंती करू नये, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
-विनोद जाधव, मुख्याधिकारी नगर परिषद, भंडारा.