लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळी असलेल्या जलाशयात काही तरुण संस्थेचे डोंग्याचे अनाधिकृत बोटींग व्यवसाय करीत होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संस्थेने जलाशयातून डोंगा हटविला आहे. या अनाधिकृत बोटींग व्यवसायावर संस्थेने बंदी आणल्याची माहिती मिळाली आहे.ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळात असणाऱ्या जलाशयात मत्स्यपालन आणि मासेमारी करण्याचे ५ वर्षाचे कंत्राट चांदपूर येथील मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेला मिळाले होते. जलाशयात मत्स्यपालन आणि मासेमारी करीत असतांना जलाशयात भ्रमंती नियंत्रण ठेवण्यासाठी संस्थेने डोंगा खरेदी केला आहे. या डोंग्याने संस्थेचे पदाधिकारी जलाशयात मासेमारी, मासे चोरी प्रकारावर आळा घालण्याचे प्रयत्न करीत आहेत. परंतु ३१ मार्च रोजी संस्थेचे कंत्राट संपले असल्याने मत्स्यपालन व मासेमारी बंद करण्यात आली आहे. या शिवाय जलाशयात बिजोत्पादन प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. जलाशयात असणाऱ्या कंत्राट पध्दती संपुष्टात आल्याने संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या जलाशयात असणारे कंत्राट संपले असले तरी मत्स्य विभागाने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवण्याचे सूचना दिल्या आहेत. यामुळे संस्थेने जलाशयातून डोंगा हटविण्याची तसदी घेतली नाही. परंतु याच डोंग्याचा काही तरुण अनाधिकृत बोटींग व्यवसायाकरिता उपयोग करीत असल्याचे दिसून आले. पर्यटकांकडून शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आले. जलाशयात नियंत्रण ठेवण्यासाठी डोंगा असतांना अनधिकृत बोटींग व्यवसायातून पर्यटकांचे जीव धोक्यात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले.संस्थेच्यावतीने या अनधिकृत व्यवसायाची चौकशी केली असता आश्चर्य झाले. जलाशयात बोटींग व्यवसायाची परवानगी नसतांना काही अप्रशिक्षीत तरुण या डोंग्याचा दुरुपयोग करीत असल्याने संस्थेचे अध्यक्ष शांताराम शहारे यांनी डोंगा जलाशयातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.जलाशयात कुणी डेंग्याचा दुरुपयोग करतांना आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल.- शांताराम शहारेअध्यक्ष, मत्स्यपालन संस्था, चांदपूर
अखेर चांदपूर जलाशयातील अनाधिकृत बोटींग व्यवसाय बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 9:52 PM
ग्रिन व्हॅली चांदपुर पर्यटन स्थळी असलेल्या जलाशयात काही तरुण संस्थेचे डोंग्याचे अनाधिकृत बोटींग व्यवसाय करीत होते. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संस्थेने जलाशयातून डोंगा हटविला आहे. या अनाधिकृत बोटींग व्यवसायावर संस्थेने बंदी आणल्याची माहिती मिळाली आहे.
ठळक मुद्देदुरुपयोगावर संस्थेचे नियंत्रण : जलाशयातून डोंगा हटविले