शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

थंडी आली रे...

By admin | Published: November 19, 2015 12:23 AM

जिल्ह्यात हळूहळू बोचऱ्या थंडीची चाहुल सुरू झाली आहे.

पारा १८ अंशावर : दोन दिवसांनंतर थंडी वाढण्याची शक्यताभंडारा : जिल्ह्यात हळूहळू बोचऱ्या थंडीची चाहुल सुरू झाली आहे. अद्यापही अपेक्षित थंडीला सुरुवात झाली नसली तरी पुढील दोन दिवसांत मात्र थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्यानुसार, मागील काही दिवसांत दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, त्यामुळे उत्तरेकडील हवेचा प्रभाव कमी झाला असून भंडाऱ्यातील तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. मात्र पुढील दोन दिवसांत थंडी वाढण्याची दाट शक्यता आहे. सोमवारला भंडाऱ्यात कमाल ३२ व किमान १८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यातुलनेत मागील तीन वर्षात मात्र नोव्हेंबरमध्ये १३ अंशापर्यंत तापमानात घट झाली होती. प्राप्त आकडेवारीनुसार १७ नोव्हेंबर २०१२ रोजी तापमान १२.२ अंशापर्यंत खाली घसरले होते. २१ नोव्हेंबर २०१३ रोजी १२.४ आणि १९ नोव्हेंबर २०१४ रोजी १२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यातुलनेत यंदा १५ नोव्हेंबरपर्यंत तापमानात अपेक्षित घट झालेली नाही. नोव्हेंबर हा गुलाबी थंडीचा महिना मानला जातो. साधारणत: दरवर्षी दिवाळीनंतर बोचऱ्या थंडीला सुरुवात होते. परंतु यंदा त्या थंडीला सुरुवात झालेली नाही. परंतु चाहुल सुरू झाली आहे. सायंकाळ होताच वातावरणात गारवा जाणवू लागतो. (प्रतिनिधी)