पवनी मच्छी उत्पादक सहकारी संस्था, पवनीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यपदी नियुक्त झाल्याबद्दल माजी न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विकास राऊत, भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे,पवनी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शंकर तेलमासरे, भंडारा जिल्हा काँग्रेस प्रसारमाध्यम प्रमुख अशोक पारधी, पवनी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोहर उरकुडकर, भंडारा जिल्हा ओबीसी महिला महासंघाच्या अध्यक्ष शोभना गौरशेट्टीवार उपस्थित होते. सूत्रसंचालन एनएसयूआयचे तालुकाध्यक्ष महेश नान्हे, तर प्रास्ताविक प्रकाश पचारे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर शिवरकर, संचालक दामोधर नागपुरे,धनराज नागपुरे,नामदेव शिवरकर,कैलास तुमसरे, प्रभाकर नान्हे,फागो दिघोरे, मोरेश्वर नागपुरे, मनोहर पचारे,अंजनाबाई शेंडे, रुखमाबाई नागपुरे, रमेश शिवरकर, मनोज केवट, गोविंद मखरे, रूपेश भानारकर, माधव मानकर, अंगत शिवरकर, राजेश नागपुरे, गुरुदास नागपुरे, मेश्राम, मानकर, राजू तुमसरे, लीलाधर शिवरकर, अक्षत नंदरधने, सुलोचना शिवरकर आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
240721\img-20210722-wa0015.jpg
राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य चंदलाल मेश्राम मार्गदर्शन करताना.