संजय मते।लोकमत न्यूज नेटवर्कआंधळगाव : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रतिष्ठान संस्थेतर्फे विदर्भासह संपूर्ण राज्यात महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यात विदर्भातून ३३ केंद्रातून ३५६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराजांच्या जन्मदिनी राज्यास रक्ताची अनोखी भेट दिली.जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावर राज्यभर ही त्यांच्या भक्तगणांमार्फत रक्तदान शिबिर आयोजित केले होते. महाराष्ट्रात एकाच दिवशी २६५४०, रक्तदात्यांनी राज्याच्या वेगवेगळ्या २९३ रक्तदान केंद्रावर रक्तदान करून एक नवा विक्रम घडविला आहे. तर राज्याबाहेरही काही शिबिरे आयोजित करून तिथे सुद्धा रक्तदान करण्यात आले. सर्वत्र महाराजांच्या चाहत्यांचा व रक्तदात्यांचा उत्साह दिसून येत होता.भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील रक्तदान केंद्रावर महाराजांचे अनुयायी व इतर रक्तदात्यांनी उत्साहाने रक्तदान केले.यावेळी या शिबिराला अनेक मान्यवरांनी उपस्थिती सुद्धा दाखवून महाराजांच्या उपक्रमाचे कौतूक केले आहे.जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांची प्रेरणा व मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अनुयायांनी सांगितले.यात मुंबईविभाग रक्तदान केंद्र ४९ तर ५५२६ रक्तदाते, मराठवाडा ६९ केंद्र ५२७८ रक्तदाते, पश्चिम महाराष्ट्र ४८ केंद्र २३६७ रक्तदाते, कोकण ४५ केंद्र ४१७६ रक्तदाते, पूर्व विदर्भ ३३ केंद्र ३५६३ रक्तदाते, पश्चिम विदर्भ १६ केंद्र ७०७ रक्तदाते सह महाराष्ट्राबाहेरील १५ केंद्रात ८५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
एकाच दिवशी २६,५४० रक्तपिशव्यांचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2018 10:08 PM
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रतिष्ठान संस्थेतर्फे विदर्भासह संपूर्ण राज्यात महाराजांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात आले. यात विदर्भातून ३३ केंद्रातून ३५६३ रक्तदात्यांनी रक्तदान करून महाराजांच्या जन्मदिनी राज्यास रक्ताची अनोखी भेट दिली.
ठळक मुद्देनरेंद्राचार्य महाराज प्रतिष्ठान संस्थेचा उपक्रम : समाजापूढे संकल्पव्रती सेवेचा आदर्श