लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : येथील सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर रामटेके व रत्नमाला रामटेके या दाम्पत्याने प्राचीन नाणे संग्रहीत करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या या संग्रहात प्राचीन सर्व भारतीय नाणी व विदेशातील नाण्यांचा समावेश आहे.प्राचीन भारतीय नाण्यामध्ये एका पैशापासून ते दहा रुपयांची नाणे आहेत. यामध्ये चांदीचे नाणेही आहेत. स्वातंत्र्याच्या अगोदरचे १९१४ मधील पंचम जॉर्ज चे एक नाणे, १९४१ ते १९४५ वर्षामधील सहाव्या जार्जचे १४ नाणे, १९१६ मधील पंचम जार्ज चा अर्धा रुपयाचे नाणे, १९१८ मधील पंचम जार्ज चे पंचेवीस पैशाचे नाणे या ब्रिटीशकालीन नाण्यांचा समावेश आहे. तसेच व्हिक्टोरिया राणीचे चांदीचे कलदार रुपयांचे १५ नाणे आहेत.या दांपत्याकडे भारतासोबत झिंबाबे, दक्षिण आफ्रीका, अरब अमीरात, इटली, सिंगापूर, नेदरलँड आदी देशातील प्राचीन नाणे आहेत. या प्राचीन नाण्याशिवाय या दांपत्याकडे एक लहान टेरिकोटा वर नक्षीकाम केलेले प्राचीन शिल्प आहे. या शिल्पाच्या एका बाजूला सुंदर नक्षीकाम केलेली भगवान बुद्धाची प्रतिमा आहे. तर दुसऱ्या बाजूला कमलपुष्प आहे. या शिल्पाचा संबंध पवनी जवळ उत्खननात सापडलेल्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या जगन्नाथ टेकडीवरच्या प्राचीन बौद्ध स्तुपाशी असल्याची शक्यता आहे. रामटेके कुटुंबियाकडील हा संग्रह पाण्याकरिता इतिहास तज्ज्ञ व इतिहासाचे विद्यार्थी त्यांच्या घरी भेट देतात.
प्राचीन नाण्यांचा असाही संग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 1:41 AM
येथील सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर रामटेके व रत्नमाला रामटेके या दाम्पत्याने प्राचीन नाणे संग्रहीत करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या या संग्रहात प्राचीन सर्व भारतीय नाणी व विदेशातील नाण्यांचा समावेश आहे.
ठळक मुद्देरामटेके दाम्पत्याचा छंद : विदेशातील नाण्यांचाही समावेश