कोंढा येथील ग्रामदैवत म्हणून मातामाय मंदिर अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण या मंदिराकडे गावातील लोकांनी दुर्लक्ष केले होते. सध्या कोरोना महामारीची साथ असल्याने गावातील तरुण, वयस्कर तसेच अनेक घरचे कुटुंब प्रमुख संक्रमित होऊन मृत्यू पावले. तेव्हा गावातील अनेक पुरुष व महिलांनी रोज नियमितपणे पूजा सुरू केले आहे. मंदिराची साफ सफाई केली आहे. कोंढा गावात आजूबाजूच्या गावांपेक्षा कोरोना संक्रमण होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. म्हणून आपल्या गावावर अशी वेळ आली आहे, तेव्हा देवी देवतांची पूजा करणे सुरू केले आहे. कोंढा गावाला लागून कोसरा पेठ येथे देखील आदिशक्ती माता मंदिरात नवरात्रात घट मांडले होते. देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना गावकरी करत आहेत. हे करीत असताना शासन नियमाचे ही पालन करीत आहेत. कोंढा, कोसरा येथे लसीकरणास नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. यामुळे निश्चितपणे कोरोना महामारीवर विजय मिळवू असा विश्वास लोक व्यक्त करीत आहेत.
कोरोना संकट टाळण्यासाठी सामूहिक प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:34 AM