विविध मागण्यांसाठी : पोलिसांचा चोख बंदोबस्त, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनभंडारा : देशव्यापी संपात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाल्याने सर्व सामान्य नागरिकांना या संपाचा फटका सहन करावा लागला.पवनी तालुक्यात १५३ कर्मचारी सहभागीपवनी : पोलीस स्टेशन पवनीचे हद्दीतील तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, लघु पाटबंधारे विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, भूमि अभिलेख कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, गोसेखुर्द वाही वसाहत कार्यालय, सेंट्रल बँक आॅफ इंडिया आणि बँक आॅफ महाराष्ट्र येथील बहुसंख्य कर्मचारी संपात सहभागी झाले होते. वर्ग ३ व वर्ग ४ चे बहुतेक सर्व कर्मचारी संपावर होेते.मोहाडी पंचायत समिती कर्मचाऱ्यांचे धरणेमोहाडी : राज्यव्यापी संपात पंचायत समितीमध्ये आस्थापना, शिक्षण, पशुसंवर्धन, एकात्मिक बालविकास प्रकल्प, तालुका आरोग्य अधिकारी विभागातील २४२ कर्मचाऱ्यांपैकी १९२ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. लाखांदूर पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी दिले निवेदनलाखांदूर : कामगारांवरील अन्यायाविरोधात लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बीडीओंच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. देशव्यापी संपाचा तुमसरात फटकातुमसर : संपात पंचायत समितीचे कर्मचारी, बँक कर्मचारी व विमा कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाल्याने कामानिमित्त्य आलेल्या नागरिकांना याचा फटका बसला. वित्तीय संस्था बंद असल्याने लाखोंचा आर्थिक व्यवहार होवू शकला नाही.संपामुळे लाखनीत नागरिकांची तारांबळलाखनी : शासनाने अवलंबिलेल्या कामगार विरोधी धोरणाविरूद्ध कर्मचारी संघटना एकवटले आहे. त्यांनी आंदोलाचे हत्यार उपसल्याने याचा नागरिकांना जबर फटका बसला. शासकीय कार्यालय तथा बँकांमध्ये कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना आल्यापावली परतावे लागले.साकोली शासकीय कार्यालयात शुकशुकाटसाकोली : देशभरातील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने साकोलीतीलही शासकीय, खासगी कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परतावे लागले. तर बँकांमध्ये आर्थिक व्यवहार होवू शकला नसल्याने लाखोंचा फटका बसला आहे.आयुध निर्माणीत संप शांततेतजवाहरनगर : संयुक्त संघर्ष समिती आयुध निर्माणी भंडारा येथे आज कारखाना समोरील पिपरी फाटावर राष्ट्रीयकृत कामगार संघटनांन मागण्याची पुर्ततासाठी निदर्शन करून संप यशस्वी केला. यात कारखान्याचा करोडोचा नुकसान वर्तविला आहे.भारतातील सर्व कामगाराच्या हक्काच्या विरोधी कायदा व नियोजन केल्यामुळे यांच्या परिणामी पुढील कामगारांना प्रभावित करणारा ठरणार आहे. यांच्या विरोधात आज आयुध निर्माणी भंडारा येथील कारखाना गेट समोरील पिपरी फाटावर स्थानिक राष्ट्रीयकृत दोन कामगार संघटनानी यात एम्लाईज व इंटक युनियन यांनी रस्ता राखून तिनही पाळीच्या कामगारांना कारखान्यामध्ये न जाण्यास मन वळविले. मागण्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मूल्य वृद्धी रोखण्यात यावे. सर्व असंघटीत व संघटीत कामगारांना सार्वभौमत्व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात यावे. इंडेक्शनच्या उपायानुसार मासिक कमीत कमी पंधरा हजार मजदूरी देण्यात यावी. कमीत कमी तीन हजार पेंशन देण्यात यावे. केंद्रीय व राज्य सार्वजनिक क्षेत्रामधील योजनेत विनीवेश थांबविण्यात यावे. कंत्राटीपद्धत बंद करून नियमित काम देण्यात यावे, श्रमिकांच्या कायद्यामध्ये एकतर्फे संशोधन करू नये, संरक्षण क्षेत्रामधील रक्षा उत्पादनमध्ये खासगीकरण ओएफबी एक विभागीय वाणिज्यीक उपक्रमसाठी ओएफबी उत्पादन आणि डीजीक्युएची गतिविधीच्या कमीवर एक्साईज ड्युटी लागू करण्याच्या निर्णयाला वापस घ्यावे.ग्रुप सी पदाची भर्ती जिल्हा रोजगार कार्यालय मार्फत भरण्यात यावे, रक्षा मंत्रालय अंतर्गत रुग्णालय आणि प्रशिक्षण संस्थान मधील कर्मचारी यांना ट्रेड युनियन करण्याचे अधिकार देण्यात यावे, रक्षा विभागात रेल्वे विभागासारखी अनुकम्पा तत्वावर भर्तीची सिमाविना घेण्यात यावे. या कारखान्यात सुमारे एकूण दोन हजार कामगार आहेत. या तीन पाळीत कामे करण्यात येतो. पहाटे चार वाजेपासून पोलिसांचा बंदोबस्त असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बंद शाततेत पार पडला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जिल्हाभरात संपाचा फटका
By admin | Published: September 03, 2015 12:23 AM