लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : विद्यार्थ्यांनी इवल्याशा हाताने रांगोळी, कुचल्याच्या सहाय्याने विविध रंग भरुन रांगोळया व चित्रे काढली गेली. रंग भरलेल्या रांगोळी व चित्राच्या माध्यमाने मतदानाचा मुलभूत हक्क प्रत्येकांनी बजावला पाहिजे. लोकशाही सुदृढ केली जावी, असा संदेश तहसील कार्यालय मोहाडी येथे कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांना आपसुक मिळत होता. निमित्त होते, राष्ट्रीय मतदार दिनाच्या आयोजनाचे.राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त तहसील कार्यालयाच्या प्रागंणात शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी मतदार जागृती करण्यासाठी तालुकास्तरीय समितीचे गठन करुन प्रश्नमंजुषा, वादविवाद, चित्रकला, रांगोळी, पथनाट्य या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित स्पर्धाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी केले. अध्यक्षस्थानी तहसीलदार नवनाथ कातकडे होते. यावेळी नायब तहसीलदार घनशाम सोनकुसरे, प्राचार्य डॉ. विलास राणे, डॉ. प्रा. पांडे, सिराज शेख, अफरोज पठाण, प्राचार्य प्रकाश करणकोटे आदी उपस्थित होते.ठाणेदार शिवाजी कदम यांनी, मतदानाचा मुलभूत हक्क बजावून लोकशाहीला अधिक सशक्त सल्ला देवून नव्या तरुणार्इंनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक राजू बांते यांनी केले. स्पर्धेसाठी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.स्पर्धेनंतर बक्षिस वितरण करण्यात आले. तहसीलदार नवनाथ कातकडे, नायब तहसीलदार घनशाम सोनकुसरे आदींच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. प्रश्न मंजुषा स्पर्धेत ६ ते ८ गटात प्रथम प्रकाश सेलोकर, द्वितिय सेजल हटवर, तृतीय कल्याणी रंभाड, ९ ते १२ वीच्या गटात प्रथम मैथीली पंचबुध्दे, द्वितीय मयुरी झंझाड, तृतीय प्रणाली आंबिलकर, वादविवाद स्पर्धेत ६ ते ८ च्या गटात प्रथम नेमिता गराडे, द्वितीय छबिता भोयर, तृतीय श्रद्धा कोहळे, प्रकाश सेलोकर, ९ ते १२ च्या गटात प्रथम रुचिका भडके, द्वितीय प्रतिक्षा वडीचार, तृतीय ऋतूजा राऊ त, चित्रकला स्पर्धेत ६ ते ८ च्या गटात प्रथम सलोनी बिरणवार, द्वितीय प्रणिता मेश्राम, तृतीय सुमित यादव, ९ ते १२ च्या गटात प्रथम शमा सुर्यवंशी, द्वितीय श्रृती बोरकर, तृतीय आयशा निखारे, रांगोळी स्पर्धेत ६ ते ८ गटात प्रथम धनश्री पिकलमुंडे, द्वितीय सेजल मोहतूरे, तृतीय लिनिता गराडे, ९ ते १२ गटात प्रथम चेतना निखारे, द्वितीय ज्योती उके, तृतीय वैभवी सात पैसे तसेच पथनाटय स्पर्धेत प्रथम जि.प. हायस्कुल आंधळगाव, द्वितीय श्रीराम विद्यालय, बेटाळा, तृतीय गुरुदेव चिंतामन विद्यालय मोहाडी तर महाविद्यालयीन गटातून प्रथम एन.जे.पटेल महाविद्यालय मोहाडी यांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात आला. यावेळी राजू बांते, वर्षा भोवते, हेमराज राऊ त, प्रमोद घमे,गोपाल बुरडे, राजू भोयर, राजेश निनावे, भारत नागोसे, दिनेश सेलूकर यांना सन्मानपत्र देण्यात आले.
मतदान जागृतीसाठी विद्यार्थ्यांनी भरले रंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 9:48 PM
विद्यार्थ्यांनी इवल्याशा हाताने रांगोळी, कुचल्याच्या सहाय्याने विविध रंग भरुन रांगोळया व चित्रे काढली गेली. रंग भरलेल्या रांगोळी व चित्राच्या माध्यमाने मतदानाचा मुलभूत हक्क प्रत्येकांनी बजावला पाहिजे. लोकशाही सुदृढ केली जावी, असा संदेश तहसील कार्यालय मोहाडी येथे कामासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांना आपसुक मिळत होता.
ठळक मुद्देराष्ट्रीय मतदार दिवस : मोहाडी तहसील कार्यालयाचा उपक्रम, रांगोळी, स्पर्धांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग