लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होत असून या मतमोजणीची रंगीत तालीम मंगळवारी घेण्यात आली. ही तालीम यशस्वीरित्या पार पडली.रंगीत तालीम घेण्यात आली त्यावेळी जिल्हाधिकारी शांतनू गोयल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भुसारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, मनीषा दांडगे, शिल्पा सोनाले, मुकुंद टोणगावकर, अनंत वालस्कर, जी.एन. तळपदे उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल असणार आहेत. रंगीत तालीममध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मतमोजणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. त्या त्या विधानसभा क्षेत्राच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतमोजणी, डाटा अपलोड, आॅनलाईन फिडींग व मॅन्युअल फिडींग बाबतचे प्रात्यक्षिक केले. यावेळी मतमोजणी पर्यवेक्षक व सहाय्यक आपापल्या टेबलवर उपस्थित होते.
मतमोजणीची रंगीत तालीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:42 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ मे रोजी लाल बहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात होत असून या मतमोजणीची रंगीत तालीम मंगळवारी घेण्यात आली. ही तालीम यशस्वीरित्या पार पडली.
ठळक मुद्देविधानसभा निहाय १४ टेबल : संकेतस्थळावर आॅनलाईन निकाल