शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्र या

By admin | Published: September 17, 2015 12:36 AM

भारताचे दिवंगत राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

भंडारा : भारताचे दिवंगत राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांच्या स्वप्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच भंडारा जिल्ह्यावरील मागासलेपणाचा कलंक पुसता येईल, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. महर्षी विद्या मंदिर येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नीलकंठ टेकाम, शुभांगी रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी सुधीर वाळके, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, नीलकंठ कायते, सुभाष वाघमारे, धिनेंद्र पुरोहित, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, प्राचार्य श्रृती ओहळे, मुख्य परीक्षक अविनाश सेनाड, उपशिक्षणाधिकारी हेंमत भोंगाडे, संजय आयलवार, लक्ष्मणराव बालवाड आदी उपस्थित होते. खा. पटोले यांच्या हस्ते शाळेच्या हॉलमध्ये स्थापित करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम हॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिथींनी गुरुपुजेने कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. शिक्षणाधिकारी शेंडे म्हणाले विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी शासनाचा योजनाचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. आजचे बाल वैज्ञानिक भविष्याचे आदर्श नागरिक आहेत. राजेश डोंगरे म्हणाले विद्यार्थ्यांसह सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून व्यवहार करणे काळाची गरज झाली आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणेची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थितांनी जिल्ह्यातील ३२५ शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृतींचे अवलोकन केले. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचे मुक्तहस्ताने कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन शेंडे यांनी तर संचालन मुकुंद ठवकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य श्रृती ओहळे यांनी केले. प्रदर्शनीसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)