लाखांदूर : जय जवान जय किसान बहु. सुशिक्षित बेरोजगार सेवा सह. संस्था, विरली बु. व्दारा संचालित हरदोली येथील धान खरेदी केंद्रांतर्गत रब्बी हंगाम २०२१ करिता बारव्हा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. या संस्थेअंतर्गत गत २५ मे रोजी येथील प्रमोद लोहारे यांच्या गोदामामध्ये हे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, संस्थेचे अध्यक्ष योगेश महावाडे यांच्या हस्ते काटापूजन करून या केंद्रांतर्गत धान खरेदीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जैतपूरचे पोलीसपाटील रमेश पागोटे, ग्रा. पं. सदस्य भैय्याजी नागोसे, संस्थेचे अध्यक्ष योगेश महावाडे, संचालक सेवक कोरे, संचालक गुणवंत काटेखाये, प्रमोद लोहारे, भारत गोमासे, किशोर बगमारे, सूरज चौधरी, देवेन्द्र बागडे, संचालक रामकृष्ण महावाडे, संदीप राऊत, विवेक अवसरे, पराग काठाने आदी उपस्थित होते.
बारव्हा येथे आधारभुत धान खरेदी केंद्राचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:36 AM