करडी (पालोरा) : आरोग्यसेवेचा लाभ जनतेला व्हावा, त्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत असलेल्या लोकांक्षु धर्मार्थ दवाखान्यास आमदार निधीतून सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन आमदार चरण वाघमारे यांनी दिले. मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव (खडकी) येथील लोकांक्ष धमार्थ दवाखान्यात आयोजित रोगनिदान व उपचार शिबिराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रामचंद्र अवसरे तसेच एसडीओ सोनाले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी तहसिलदार जयराज सुर्यवंशी होते. यावेळी मंचावर बाबू ठवकर, चरणदास मेश्राम, संजय चावरे, जि.प. सदस्य सरिता चौरागडे, निलिमा इलमे, उत्तम कळपते, सरपंच सारिका धांडे, उपसभापती विलास गोबाडे, पं.स. सदस्य उपस्थित होते. आमदार अवसरे यांनी दवाखान्याचे संस्थापक प्रदीप रंगारी एका शिक्षकाने स्वकमाईतून लोकांसाठी प्रशस्त असा दवाखाना ग्रामीण आदिवासी भागात बांधले. कोणत्याही सरकारी गैरसरकारी मदतीशिवाय तो चालवणे, हे सेवेचे कार्य आहे, असे ते म्हणाले, शक्य ती मदत दवाखान्यास करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.यावेळी दवाखान्यात १५७ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. १८७ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. २७ रुग्णांची रक्तगट तपासणी इतर पॅथॉलॉजीष्ट तपासणी करण्यात आली. याचेवळी तहसिलदार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात राजस्व विभागातर्फे वेगवेगळ्या योजना यावेळी राबविण्यात आल्या. रेवेन्यू विभागामार्फत राशनकार्ड, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आदीेंचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले होते. वनविभाग कोकाच्या वतीने यावेळी गरजूंना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात आले.प्रास्ताविक संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सुनिता रंगारी यांनी मांडले. भंडारा येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. मधुकर रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र करडीच्या वैद्यकीय चमूचे सहकार्य केले. (वार्ताहर)
धर्मार्थ दवाखान्याला सर्वतोपरी मदतीसाठी कटिबद्ध
By admin | Published: October 09, 2015 1:22 AM