लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राष्ट्राच्या विकासात शिक्षकांचे स्थान महत्वाचे आहे. शिक्षक हे समाजाला नवी दिशा देण्याचे पवित्र काम करतात. पदोन्नतीचे मुख्याध्यापकाचा पदभार स्विकारणाऱ्या शिक्षकांना शाषणाकडून प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी ज्यामुळे शालेय प्रशासन सुरळीत चालले व शिक्षकांना न्याय मिळेल. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.भाजपाची सैध्दांतिक भूमिका, पक्षाचा इतिहास व वाटचाल आणि शिक्षकांचे व्यवसायिक प्रश्नाच्या प्रबोधनाकरिता भंडारा जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीतर्फे जिल्हा मेळावा व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन नुकतेच दोनशे शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.मेळाव्याचे उद्घाटन तारीक कुरैशी जिल्हा अध्यक्ष भाजपा तथा सभापती आणि नागपूर विभाग यांच्या हस्ते पार पडला. यावेळी मंचावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आमदार चरण वाघमारे, भाजपा शिक्षक आघाडीचे विदर्भ सामाजिक तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ. उल्हास फडके, विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर, नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशु गोंडाणे, मार्गदर्शक तेलपांडेजी, प्रा. हेमंत देशमुख जिल्हा प्रशिक्षण प्रमुख भाजपा, मार्गदर्शक ज्ञानेश्वर बोडखे, सहप्रमुख नितीन कारेमोरे, भंडारा जिल्हा शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक कैलास कुरंजेकर, नागपूर जिल्हा ग्रामीणचे संयोजक मेघशाम झंझाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास कुरंजेकर यांनी भाजपा शिक्षक आघाडीचे कार्य, रचना, विविध क्षेत्रात काम करणाºयया आघाड्या या विषयी माहिती देवून शिक्षकांच्या बाजूने आमची संघटना नेहमीच सोबत राहील असे आश्वासन दिले. उद्घाटक तारीक कुरैशी यांनी भाजपाचा इतिहास व वाटचाल, सध्याची परिस्थिती यासोबत संपूर्ण शिक्षकांनी एकजुटीने राहण्याचा उपदेश दिला. शिक्षकांनी गुणवत्तावाढवून समाजाची प्रतिमा उंचवावी, असे सांगितले. डॉ. उल्हास फडके यांनी आपल्या प्रदिर्घ अनुभवाचे अनेक पैलु उलघडले व शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडली. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी अगदी कमी वेळात शिक्षकांनी आत्मपरीक्षण करुन जागरुक राहण्याची प्रतिपादन केले. उपाध्यक्ष आशु गोंडाने यांनी शिक्षकांच्या मदतिला सदैव तत्पर असल्याचे सांगितले.उपस्थित शिक्षकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे विदर्भाचे सहसंयोजक अनिल शिवणकर यांनी दिले. डीएसपीएस, निवृत्ती वेतन, थकबाकी, सेवाजेष्ठता, निवडश्रेणी अशा विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सहसंयोजक माधव रामेकर यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बोडखे यांनी केले. कार्यक्रमाकरिता शशांक चोपकर, मंगला साहोबे, घनश्याम तरोणे, प्रसन्न नागदेवे, धनंजय पुस्तोडे, अरुण पारधी, अरुण मोखोरे, शरदगिरी, कांचन गहाणे, अनिल हलमारे, रमेश गायधने, कृष्णा खेडीकर यांनी सहकार्य केले.
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 9:43 PM
राष्ट्राच्या विकासात शिक्षकांचे स्थान महत्वाचे आहे. शिक्षक हे समाजाला नवी दिशा देण्याचे पवित्र काम करतात. पदोन्नतीचे मुख्याध्यापकाचा पदभार स्विकारणाऱ्या शिक्षकांना शाषणाकडून प्रशिक्षणाची सोय करण्यात यावी ज्यामुळे शालेय प्रशासन सुरळीत चालले व शिक्षकांना न्याय मिळेल.
ठळक मुद्देचरण वाघमारे : जिल्हा भाजपा शिक्षक आघाडीतर्फे जिल्हा मेळावा