परिणय फुके यांचे प्रतिपादन.
पवनी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत झाले. आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला, पैसा असूनही या परिस्थितीमध्ये उपचार होऊ शकले नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी जमेल तेवढी मदत कोरोनाग्रस्तांना केली. या शिवाय तिसऱ्या लाटेच्या तयारीसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर उपलब्ध करून दिले. याचा वापर सामान्य माणसापर्यंत करा, असे आवाहन माजी मंत्री परिणय फुके यांनी केले.
भारतीय जनता पक्ष पवनी तालुका कार्यालयात ऑक्सिजन काॅन्सेंट्रेटर वाटपाचा सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष शिवराम गिरेपुंजे होते. यावेळी लोकसभा संघटनमंत्री बाळा अंजनकर, जिल्हा महामंत्री चैतु उमाळकर, सहकार नेते विलास काटेखाये, ओबीसी नेते राजेश बांते, कोमल गभने, तिलक वैद्य, मोहन सुरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला राजेंद्र फुलबांधे, प्रकाश कुर्झेकर, दत्तू मुनरतीवार, सुरेश अवसरे, विकी अवचट, मच्छिंद्र हटवार, संदीप नंदरधने, माधुरी नखाते, अनुराधा बुराडे, निर्मला तलमले, सोनू देविकर, लोकेश गभने, धनंजय मुंडले, खेमराज जीभकाटे, विनोद धारणे, मयूर रेवतकर, कविता कुळमते, उषाकिरण सूर्यवंशी, पांडुरंग गभने, दिगंबर वंजारी, हरीश बुराडे, पुरुषोत्तम नंदनवार, डॉ. संदीप खंगार, डॉ. राजेश नंदुरकर, सुनील किरमीरे, राजू चोपकर व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.