शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट : आता बीड रडारवर, सात विद्यार्थ्यांकडे बिहारची प्रवेशपत्रे; पालक-विद्यार्थी चाैकशीच्या फेऱ्यात 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२४: आजचा दिवस पूर्णतः अनुकूल व लाभदायी, मित्रांकडून लाभ होईल!
3
हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 
4
कोकण, गोव्यात अतिवृष्टीचा इशारा; मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
5
होर्डिंगच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी समिती स्थापणार - उदय सामंत
6
हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान 
7
फोनचा रिचार्ज महागला! जिओपाठोपाठ एअरटेलने केली मोबाइल सेवांच्या दरांत मोठी वाढ
8
India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती
9
रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 
10
पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती
11
नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले
12
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
13
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
14
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
15
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
16
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
17
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
18
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
19
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
20
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना

प्रधानमंत्री घरकूल योजनेत साडेआठ हजार घरकूल पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 10:17 PM

जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात शासनाच्या विविध लोकोपयोगी कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली असून प्रधानमंत्री घरकूल योजनेंतर्गत जिल्ह्यात आठ हजार ७६४ घरकूल पूर्ण झाले आहेत तर मुख्यमंत्री पेयजल योजनेची ८.५ कोटींची कामे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात मागील तीन वर्षात १५ हजार ४५३ घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी सात हजार ८६४ घरकुल पूर्ण झाले असून प्रपत्र ड मध्ये १६ हजार घरकुलांची डाटा ऐंट्री करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १२ योजना सुरू आहेत. त्यावर आठ कोटी पाच लाख रूपयांचा खर्च होणार आहे.त्यापैकी २०१८ अखेरपर्यंत नऊ योजना पूर्ण होणार आहे. कृषी पंपांना वीज पुरवठ्यांतर्गत ५० कोटी रूपयांच्या कामाचे कार्यारंब आदेश देण्यात आले आहे. ही कामे डिसेंबर २०१९ पर्यंतपूर्ण होणार असल्याची माहिती दिली.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत २०१७-१८ मध्ये १६२ लाभार्थ्यांना ५३ लाख ४१ हजार रूपयांचा लाभ देण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेत १३७५ पैकी १२५२ कामे पूर्ण झाली असून त्यावर १२ कोटी ६५ लाख रूपये खर्च करण्यात आले आहे. २०१८-१९ मध्ये १४० गावांमधील २२२७ कामांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली आहे.या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड उपस्थित होते.न्यायालयाचा स्थगनादेशाने अतिक्रमण हटविले नाहीअशोक लेलँड कंपनीच्या चिखली हमेशा येथील जागेबाबत जुलै १९९४ मध्ये कंपनीने न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाकडून अंतिम स्थगनादेश देण्यात आले आहे. डिसेंबर २००५ मध्ये कंपनीने केंद्र सरकारकडे वनजमीन मागणीवा प्रस्ताव सादर केला. राज्य शासनाने एप्रिल २००५ मध्ये तो प्रस्ताव पाठविला. कंपनीने उच्च न्यायालयात दाखल केलेले प्रकरण पुन्हा सुनावनीस आले. २० जून २००६ च्या आदेशान्वये कंपनीच्या प्रस्तावाबाबत केंद्र शासनाचा निर्णय होईपर्यंत व त्यानंतर एक महिन्यापर्यंत आॅक्टोबर १९९४ मधील दिलेला स्थगनादेश कायम राहिल, असा न्यायालयाचा आदेश आहे. कंपनीचे जमीन मागणी प्रकरण प्रलंबित असल्याने व उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने अतिक्रमण हटविण्यात आले नसल्याची माहिती जिल्हाधिकाºयांनी दिली. जिल्हा प्रशासन कुणालाही पाठीशी घातल नसल्याचे त्यांची सांगितले.