सिंचनाची समस्या : शेतकरी चिंतातूर, निधीची तरतूद करणे गरजेचेभंडारा : बावनथडी प्रकल्पा अंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, टाकला, उसर्रा, विहीरगाव, मोरगाव, महालगाव, धोप, काटेबाम्हणी, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी शेतमजूर एकता मंचच्या जिल्हा अध्यक्षा तथा डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या गभने यांनी केली आहे.बावनथडी प्रकल्पाचे कालवे निर्माण करून शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन संपादित करण्यात आली. काही प्रमाणात कामे सुरू करून निधी अभावी बंद पाडण्यात आली होती. त्यामुळे कालवे अपूर्ण असल्याने टेलपर्यंत सिंचनाची व्यवस्था होऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून उत्पादन काढता येत नसल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तत्कालीन सरकारच्या दुर्लक्षामुळेच मोहाडी तालुक्यातील कालव्याचे काम अपूर्ण राहीले हे सत्य असले तरी विद्यमान सरकारने बावनथडी प्रकल्पा अधिनस्त मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, उसर्रा, टाकला, टांगा, विहीरगाव, काटेबाम्हणी, धोप, पालडोंगरी या गाव परिसरातील अपूर्ण कालवे पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद करून अपूर्ण कामे पूर्ण करणे काळाची गरज आहे. यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डोंगरगाव परिसरातील अपूर्ण कालव्यांची प्रत्यक्ष मोका पाहणी करून शासनाकडे निधीची मागणी करणे गरजेचे असताना संबंधित विभागाचे याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष होत असल्याने डोंगरगाव, काटेबाम्हणी, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, टांगा, कुशारी, टाकला, उसर्रा या गाव परिसरातील शेतकरी अजुनही बावनथडी प्रकल्पच्या सिंचनापासून वंचित आहेत. सिंचनाची व्यवस्था रखडली असल्याने सर्व शेतकरी पिक उत्पादनाअभावी आर्थिक संकटात सापडले असून यामुळे त्यांचे बेहाल होत असून ते चिंतातूर हवालदिल व वैफल्यग्रस्त झाले आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शासन प्रशासनाने याबाबत वेळीच दखल घेवून तसेच सम्यक विचार करून बावनथडी प्रकल्पाअंतर्गत मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव, भिकारखेडा, मोरगाव, महालगाव, काटेबाम्हणी, टाकला, उसर्रा, विहिरगाव, कुशारी या गाव परिरातील अपूर्ण कावले तात्काळ पूर्ण करण्याची निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)
बावनथडीचे अपूर्ण कालवे पूर्ण करा
By admin | Published: March 05, 2017 12:36 AM