लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे. या अभियानाच्या अनुषंगाने सरकारने कार्यक्रम आखल आहे. सन २०१६-१७ मध्ये १० जिल्ह्याची निवड केली असून यात भंडारा जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चार वर्षात ८६ हजार वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून ओडीएफ प्लसच्या दिशेने जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत २०१२ मध्ये करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार भंडारा जिल्ह्याची एकूण कुटूंब संख्या २ लाख ७ हजार ६२६ एवढी आहे. त्यापैकी १ लाख २१ हजार ६२५ कुटूंबाकडे २०१२ पूर्वी वैयक्तिक शौचालय होते. त्यामुळे उर्वरित ८६ हजार १ कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्टय जिल्ह्याला प्राप्त झाले होते. हे उद्दिष्टय जिल्ह्याने निर्धारित चार वर्षात पूर्ण केले आहे.सन २०१३-१४ मध्ये ६ हजार ३०६, सन २०१४-१५ मध्ये ९ हजार ५६०, सन २०१५-१६ मध्ये १३ हजार २१७ व सन २०१६-१७ मध्ये ५६ हजार ९१८ असे एकूण ८६ हजार १ वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. प्राप्त लक्षांक भंडारा जिल्ह्याने निर्धारित वेळेत गाठून पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्हा हागणदारी मुक्त केला आहे.भंडारा तालुक्यात ११ हजार २५१, लाखांदूर तालुक्यात ८ हजार ४६८, लाखनी तालुक्यात ११ हजार ५८३, मोहाडी तालुक्यात १५ हजार २५, पवनी तालुक्यात ८ हजार २८२, साकोली तालुक्यात १३ हजार ४८१ व तुमसर तालुक्यात १७ हजार ९११ असे तालुकानिहाय वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहेत.जिल्ह्यात २ लाख ७ हजार ६२६ कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय झाली आहेत. तालुकानिहाय वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून बांधकाम झालेल्या संपूर्ण शौचालयाचे मोबाईल अॅपद्वारे १०० टक्के फोटो अपलोड करण्यात आले आहेत. सद्या जिल्ह्यात ओडीएफ प्लसच्या दृष्टीने कामकाज सुरू असून ना दुरूस्त शौचालयाचे बांधकाम व बांधकाम झालेल्या शौचालयाच्या वापराकरीता जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून गावागावात उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा हागणदारीमुक्त करण्याच्या दृष्टीने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी केली.गावकºयांच्या भागीदारीने व प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त होऊ शकला. ग्रामीण भागात बºयाच ठिकाणी उघडयावर शौचास जाणे सुरू आहे. मात्र या अभियानांतर्गत प्रत्येक कुटूंबासाठी शौचालय बांधून देण्याची योजना असल्यामुळे अनेक खेडे हागणदारीमुक्तीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या स्वच्छ भारत आवाहनानुसार भंडारा जिल्ह्यात वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम निर्धारित वेळेत पूर्ण करून जिल्हा हागणदारीमुकत करण्यात आला आहे. एवढयावरच थांबणार नसून जिल्ह्याची वाटचाल आता ओडीएफ प्लसच्या दिशेने सुरू आहे. यासोबतच नागरिकांनी शौचालयाचा वापर करावा. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्ह्याचे हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे.- मनोजकुमार सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. भंडारा.
चार वर्षांत ८६ हजार शौचालय बांधकाम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:42 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ आॅक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे.
ठळक मुद्देजिल्हा हागणदारीमुक्त घोषित : ओडीएफ प्लसच्या दिशेने स्वच्छता मिशन कक्षाची वाटचाल