मागच्या वर्षीपासून हा कार्यक्रम साध्या रीतीने व कमीत-कमी भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा केल्या जातो. यानिमित्ताने सामाजिक जनजागृतीच्या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने जातिभेद निर्मूलन, हुंडा प्रतिबंध, स्वच्छता या विषयांचा समावेश होता.
''मी अमक्या जातीचा, माझ्याकडे इतकी संपत्ती आहे, माझे अमुक गोत्र आहे, माझे कुळ नावाजलेले आहे, मी उत्तम शीलसंपन्न आहे,'' यासारखे विचार स्वत:चा अभिमान वाढवणारे व भगवंतांपासून माणसाला दूर नेणारे आहेत. व्यवहारात या गोष्टींचा उपयोग असला, तरी भगवंतांच्या प्राप्तीसाठी मुळीच नाही. कारण यामुळे भेदभाव उत्पन्न होतो आणि भगवंतच सर्व काही आहेत, हा विचार नाहीसा होतो. म्हणून या गोष्टी काल्पनिक आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याविषयी आसक्ती बाळगू नये, तसा त्यांचा द्वेषही करण्याचे कारण नाही. जसे, लहानपणी आपण खेळत असलेली खेळणी मोठेपणी आपण पाहतो, तेव्हा त्यांच्याविषयी आपल्याला प्रेमही वाटत नाही किंवा द्वेषही वाटत नाही.
त्यांच्याविषयी आपली वृत्ती उदासीन असते. मोठेपणी आपले ध्येय वेगळे असते, त्याकडे आपली दृष्टी. तसेच नामधारकाने प्रपंचातील या गोष्टींविषयी उदासीन राहून, भगवत्प्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठी वेळ फुकट न घालवता अखंड भजन करीत राहावे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाजातून अंधश्रद्धा व जातिभेदाचे निर्मूलन करून हरिभक्तीच्या मार्गावर लावण्याचे कार्य केले. आपणही संत वाङ्मयाचा अभ्यास करून समाजातून जातिभेदाचे निर्मूलन करावे, असे मार्गदर्शन प्रवचनकार हभप धनराज गाढवे महाराज यांनी केले.
या वेळी शंकर कांबळे, धनवर बडगे, शालिक ईश्वरकर, दामोदर ईश्वरकर, अरविंद देवगडे, भोजराम माटे, ईश्वर बुधे, अशोक ईश्वरकर, वासुदेव बडगे, रामा धोटे व मंदिर परिसरातील भाविक उपस्थित होते.
050921\img-20210905-wa0035.jpg
निलज येथे ज्ञानेश्वरी पारायणाची समाप्ती