दखल ‘लोकमत’ची : बांधकाम झालेल्या गाळ्यात होणार जनावरांची तात्पुरती सोयइंद्रपाल कटकवार भंडाराशहरातील मोकाट जनावरांच्या संदर्भात ‘लोकमत’ तथा सामाजिक कार्यकर्त्यांनी उचलेल्या समस्येवर नगर पालिका प्रशासनाने दखल घेतली. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास नगराध्यक्ष बाबुराव बागडे, मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी बसस्थानकाच्या उत्तर दिशेला असलेल्या जुन्या नाका परिसरात बांधलेल्या गाळयांची पाहणी केली. तसेच पुढील आठवड्यात या जागेची स्वच्छता करून जनावरे ठेवण्याची तात्पुरती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तीन दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत जाऊन अध्यक्ष बाबूराव बागडे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची भेट घेतली होती. याबाबत लोकमतने सातत्याने वृत्त प्रकाशित केले होते. तसेच पालिकेला या समस्येवर तोडगा काढण्यासाठी १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता. नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी १५ दिवसात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तत्पूर्वीच पालिका प्रशासनाने कार्यतत्परता दाखविली. असाच सामंजस्यपणाचा निर्णय अतिक्रमणाच्या बाबतीत घेतल्यास त्याचा फायदा सर्वांनाच होईल. नगराध्यक्ष बाबुराव बागडे व मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी बसस्थानकाजवळील जुन्या नाका मधील गाळ्यांची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.नितीन तुरस्कर, आशू गोंडाणे, नितीन दुरगकर, नितीन साकुरे, विकास मदनकर, सचिन घनमारे, रवि नेवारे, भूपेश तलमले, पालिकेचे कर्मचारी धर्मेंद्र साखरकर, अभियंता कांबळे, अभियंता जांभुळकर, भावसागर आदी उपस्थित होते. शहराप्रती असलेली आपुलकी व समस्या सोडविण्यासाठी असलेली तळमळ याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी सामािजक कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
कोंडवाड्यासाठी जागेची पाहणी
By admin | Published: August 14, 2016 12:13 AM