जिल्ह्यात एक लाख तीन हजार २०३ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबची चाचणी करण्यात आली. त्यात १२ हजार २१० व्यक्ती २७ डिसेंबरपर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले. तर ११ हजार ४९५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. २८९ व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले. पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळला. तेव्हा आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली होती. नंतर मात्र हळूहळू रुग्ण संख्या वाढत गेली. आरोग्य यंत्रणाही त्याच पद्धतीने सक्षम झाली. ग्रामीण आणि शहरी आरोग्य यंत्रणा प्रभाविपणे राबतात दिसून आली. कधीही शासकीय रुग्णालयाचे उंबरठे न गाठणारे या काळात शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दिसू लागले. या परिस्थितीत खाजगी डॉक्टरांनीही आपली मोलाची सेवा दिली. मात्र काही डॉक्टरांवर रुग्णांची अधिक पैसे घेतल्याचा ठपका ठेवला. क्वॉरंटाईन सेंटरमधील अनास्थेबद्दलही अनेकदा ओरड झाली. शासकीय रुग्णालयातही योग्य उपचार होत नसल्याच्या बोंबा होत्या. परंतु या सर्व टिका टिपण्णींना बाजूला ठेवत आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे कोरोना नियंत्रणाचे काम केले. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जावून सर्व्हेक्षण केले. एकंदरीत कोरोनाने आरोग्य यंत्रणा सक्षमच नाही तर सर्वसामान्यांचा विश्वास दृढ झाला, हे या सरत्या वर्षाने दिलेली देणच म्हणावी लागेल.
बॉक्स
रस्त्या रस्त्यावर मास्कची विक्री
कोरोना येण्यापुर्वी तोंडावर मास्क बांधणे म्हणजे आजारी असणे असा काहीचा समज होता. आरोग्य सेवेतील मंडळीच मास्कचा वापर करीत होते. परंतु कोरोनाने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना मास्क बांधणे सक्तीचे केले. कोरोनावर कोणतेही औषध नसल्याने मास्क हाच प्रभावी उपाय आहे. वर्षभरात मास्कची प्रचंड मागणी वाढली. औषधी दुकानातून एन-९५ मास्कसह विविध मास्कची चढ्या किंमतीत विक्री झाली. त्याच काळात शहरातील रस्त्या रस्त्यांवर मास्कचे दुकान लागले. आजही विविध ठिकाणी रस्त्यावर मास्क विकले जात आहे. कापड दुकानापासून जनरल स्टोअर्समध्येही दर्शनी भागात दिसून येतात.
बॉक्स
असे वाढले रुग्ण
मार्च ००
एप्रिल ०१
मे ३०
जून ४९
जुलै १७०
ऑगस्ट १०३०
सप्टेंबर ३९५८
ऑक्टोबर ३०८१
नोव्हेंबर १५६४
डिसेंबर १४५२
२७ डिसेंबरपर्यंत.
मृत्यू
मार्च ००
मे ००
जून ००
जुलै ०२
ऑगस्ट २१
सप्टेंबर ९२
ऑक्टोबर १००
नोव्हेंबर ३६
डिसेंबर ३८
२७ डिसेंबरपर्यंत.