लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिलांनी संधी समजून घेतल्या की, संघर्षातून यशाची शिखरे गाठता येतात, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) भंडारा येथील जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले.माविम प्रांगण मोहाडी येथे शुक्रवारला जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.काठोळे म्हणाले, महिलांनी त्यांच्यातील सुप्तगूण ओळखणे, त्यांच्या कार्याचा समाजामध्ये ठसा उमटविणे आवश्यक आहे, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात येत असतो. संघर्षातूनच आपल्या कार्याला प्रेरणा मिळत असते, असे मत व्यक्त केले.याप्रसंगी महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, मतदान जागृतीवर रांगोळी स्पर्धा, लिंबू स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत महिला आर्थिक विकास महामंडळ भंडारा अंतर्गत असलेल्या भंडारा, तुमसर, मोहाडी, वरठी, पवनी, लाखांदूर, पालांदूर येथील लोकसंचालित साधन केंद्रातील महिला कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता. यातील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी सहायक जिल्हा समन्वय अधिकारी विष्णुपंत झाडे, लेखाधिकारी मुकूंद देशकर, मुल्यमापन व संनियंत्रण अधिकारी मकसुद शेख, लोकसंचालित साधन केंद्राचे अध्यक्ष विणा लाडे, शशिकला तुरकर, शारदा गाडेकर, छाया साखरवाडे, भारती झंझाड, रोहिणी कोरे, प्रमिला चांदेवार, करिष्मा ऊईके, व्यवस्थापक मंदा साकोरे, रंजना खोब्रागडे, लिलाधर शिवरकर, गौतम शहारे, वनमाला बावनकुळे, कल्याणी गजभिये, वंदना भिवगडे, रेखा उमाळे, ललिता कुंभलकर, मनोज केवट आदी उपस्थित होते.कार्यक्रमाला लेखापाल प्रवीण रंगारी, आशिष मेश्राम, मृणाल शिंगणजुडे, जितेंद्र मेश्राम, राकेश कुरंजेकर, धनंजय चौधरी, सुनील कापगते, वैभव साठवणे, शामराव बोंद्रे यांच्यासह सर्व सहयोगीनी, बचतगट गटातील महिला उपस्थित होत्या. यावेळी मोहाडीत महिलांची एकच गर्दी दिसून आली.
संघर्षातून यशाची शिखरे गाठता येतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 9:50 PM
महिलांनी संधी समजून घेतल्या की, संघर्षातून यशाची शिखरे गाठता येतात, असे प्रतिपादन महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) भंडारा येथील जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांनी केले.
ठळक मुद्देप्रदीप काठोळे : मोहाडी येथील माविम प्रांगणात जागतिक महिला दिन उत्साहात