शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

‘बकरी ईद’च्या सुटीविषयी शिक्षण विभागाकडून संभ्रम

By admin | Published: September 23, 2015 12:46 AM

मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या बकरी ईदच्या तारखेविषयी संभ्रमावस्था असल्याने अनेकांना सुटीविषयी शासकिय कार्यालयांमध्ये चर्चांना उधाण आले आहे.

अधिकारी म्हणतात, प्रिंट मिस्टेक : सप्टेंबरऐवजी २५ आॅक्टोबरला दाखविला सणभंडारा : मुस्लिम धर्मीयांचा महत्त्वपूर्ण सण असलेल्या बकरी ईदच्या तारखेविषयी संभ्रमावस्था असल्याने अनेकांना सुटीविषयी शासकिय कार्यालयांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. कालदर्शिकेमध्ये हा सण २४ व २५ सप्टेंबरला दर्शविण्यात आला आहे. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी असलेल्या परिपत्रकामध्ये हा सण २५ आॅक्टोंबर दाखविण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.परमेश्वराच्या भक्तीमार्गातील अस्सीम त्यागाचे बकरी ईद हे प्रतीक आहे. अरबी महिन्याच्या ‘जिल्काद’ या महिन्यामध्ये हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये अखिल विश्वात साजरा केला जातो. मुस्लिम धर्मात मुख्य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत यात परमेश्वर व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. पैकी हज हे कर्तव्य ज्याची कुवत आहे अशांसाठी आहे. या कर्तव्यात मक्का येथे जाऊन 'खान-ए-काबा'चे दर्शन घेणे, तसेच अराफात व मुजदलिफा या ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घेणे यांचा समावेश यात आहे. याबरोबरच परमश्रेष्ठ अल्लाहच्या मार्गात बकरीचे बलिदान देणे यांचा अंतर्भाव आहे. इस्लामचे आद्य प्रेषित हजरत इब्राहिम हे परमश्रेष्ठ अल्लाहचे निस्सीम भक्त होते. अल्लाहच्या मार्गात त्यांनी आपली सर्व संपत्ती व परिवाराचा त्याग केला. त्या गोष्टीचे स्मरण सर्व मुस्लिम बांधवांच्या अंगी बाणवण्याकरिता बकरी ईद साजरी केली जाते. बकरी ईद सणाला शासकीय सुटी जाहिर करण्यात आली आहे. मात्र कालदर्शिकेमध्ये २४ तारखेला बकरी ईद (मुंबई) तर २५ ला बकरी ईद (नागपूर) असे दर्शविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या पत्रकांमध्ये हा सण २५ सप्टेंबरला असल्याने या दिवशी सुटी जाहिर करण्यात आली आहे. असे असताना शिक्षणाधिकाऱ्यांनी सुटी जाहिर केलेल्या पत्रामध्ये बकरी ईद (ईदउल-झुआ) सण २५ आॅक्टोंबर २०१५ शुक्रवार असे दर्शविले आहे.सदर सुट्यांचा पत्रावर सुट्यांमध्ये बदल करताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करुन बदल करता येईल अशी टीपही लिहीलेली आहे. सदर पत्राच्या प्रतिलिपी शिक्षण विभागांशी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. यासंदर्भात इकबाल सिद्दीकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बकरी ईद सण शुक्रवारला असून तारीख २५ सप्टेंबर असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (नगर प्रतिनिधी)सुटी जाहीर केलेल्या पत्रामध्ये बकरी ईद सण २५ आॅक्टोबर शुक्रवारला दर्शविण्यात आला आहे. दर्शविण्यात आलेल्या आॅक्टोबर या शब्दाऐवजी सप्टेंबर असे हवे होते. छपाई दरम्यान ही चूक झालेली आहे. बकरी ईद सण २५ सप्टेंबरला असून या दिवशी सुटी राहील. २४ तारखेला सर्व शाळा महाविद्यालय सुरु राहतील.- किसन शेंडेशिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, भंडारा