मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी शिक्षण विभागाच्या विनंतीवरून नागपूर जिल्ह्यातील अधिक तालुक्यांमध्ये भेटी देऊन शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांना यांना मार्गदर्शन केले. नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत मुख्य कार्यपालन अधिकारी कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात ‘बेस्ट प्रॅक्टिसेस’ हा गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने उत्कृष्ट काम करणाऱ्या शाळेतील शिक्षकांच्या कामाची दखल घेऊन जिल्ह्यातील इतर शाळा आदर्श करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काटोल येथे झालेल्या कार्यक्रमात मुबारक सय्यद यांचे सत्कार प्रसंगी डायट प्राचार्य हर्षलता बुराडे, राज्य विज्ञान प्राधिकरणाचे संचालक रहमतकर आणि जिल्हा परिषद नागपूरचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, सर्व तालुक्याचे गट विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षक उपस्थित होते.
मुबारक सैय्यद यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:32 AM