मोहाडी तालुक्यातील प्रलंबित कृषी वीज पंपाची जोडणी करणे तसेच थकीत कृषी, घरगुती व गृह उद्योग व्यावसायिक वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करू नये, कृषीपंप वीज ग्राहकांना वीज बिलात सवलत देण्यात यावी, लाईनमेन कर्मचार्यांनी विद्युत जोडणीचे काम स्वत: करावे, अनधिकृत खासगी व्यक्तीकडून विद्युत जोडणीचे काम करू नये, विद्युत विभागाच्या संहितेतील अटी, शर्ती व अधिनियमाच्या अधीन राहून कामकाज करण्यात यावे, वीज ग्राहकांशी अपमानजनक वागणूक करणार्या कर्मचार्यांवर रीतसर कारवाई करण्यात यावी, भारनियमन बंद करण्यात यावे यासारख्या इतर समस्यांबाबत मोहाडी येथील विद्युत विभागाच्या उपविभागीय अधिकार्यांशी काँग्रेस पदाधिकार्यांनी चर्चा केली असता उपविभागीय अधिकार्यांनी समस्या विहीत कालावधीत निकाली काढण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
शिष्टमंडळात मोहाडी तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश हटवार, राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र इलमे, तुमसर मोहाडी विधानसभा बूथ प्रमुख गजानन झंझाड, जेष्ठ नेते आशिष पात्रे, न. प. उपाध्यक्ष सुनील गिरीपुंजे, काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष हरिराम निमकर, डॉ. विनोद मते, प्रदीप डेकाटे, धनराज गायधने, श्रीधर गिरेपुंजे, काशिनाथ गिरेपुंजे, अयुब शेख, गजानन बशीने, योगीराज दमाहे, अमित खोब्रागडे, राधेश्याम खोब्रागडे, शंकर मोहरे, देवीलाल लिल्हारे, शिवलाल लिल्हारे, कुकडे तसेच काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.