शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

भंडाऱ्यात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:35 AM

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. मात्र केंद्र व राज्य सरकार असंवैधानिक कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहे.

ठळक मुद्देपटोले, डोंगरे यांचा सत्कार : सरकारवर टीका

आॅनलाईन लोकमतभंडारा : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले. मात्र केंद्र व राज्य सरकार असंवैधानिक कामे करून जनतेची दिशाभूल करीत आहे. आता आपण काँग्रेसमध्ये येताच तिकडे दुखणे सुरु झाले आहे. त्यांना चिंता करू द्या, तुम्ही मात्र आता कामाला लागा, असे आवाहन माजी खासदार नाना पटोले यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित सत्कार सोहळा व कार्यकर्ता मेळव्यात ते बोलत होते.यावेळी जिल्हा काँग्रेसच्यावतीने माजी खासदार नाना पटोले, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, लाखनीचे प.स. सभापती रविंद्र खोब्रागडे, उपसभापती घनश्याम देशमुख पवनीचे पं.स. सभापती बंडू ढेंगरे , उपसभापती मधू गभने यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी आमदार सेवक वाघाये, माजी आमदार अ‍ॅड.आनंदराव वंजारी, जिल्हा प्रभारी प्रफुल गुडधेपाटील, प्रदेश महासचिव मुजीब पठाण, जिया पटेल, प्रमिला कुटे, प्रमोद तितिरमारे, मधुकर लिचडे माजी नगराध्यक्ष बशिर पटेल, सभापती विनायक बुरडे, नीळकंठ टेकाम, युवराज वासनिक, सीमा भुरे आवेश पटेल, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कारेमारे, प्रकाश पचारे, भंडारा नगर परिषदेचे गटनेता शमीम शेख उपस्थित होते. संचालन अजय गडकरी यांनी तर आभारप्रदर्शन अनिकजमा पटेल यांनी केले.यावेळी रमेश डोंगरे म्हणाले, जिल्हा परिषदेत जनतेच्या कामांना प्राधान्यक्रमाने सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे म्हणाले, कार्यकर्त्यांनी हेवेदावे व गटातटाचे राजकारण न करता एकजुटीने राहावे, असे आवाहन केले. यावेळी सेवक वाघाये, आनंदराव वंजारी, प्रफुल गुडधे पाटील, जिया पटेल, मुजीब पठाण, प्रमिला कुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी मुकुंद साखरकर, प्रशांत देशकर, अजय गडकरी, सचिन फाले, रोशन दहिकर, छोटू गणवीर, शाहीन मून यांनी सहकार्य केले.पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन करणारदेशात आणि राज्यात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढवत आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून या दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जनतेत असंतोष असून जनतेची लूट सुरु आहे. इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली असून सर्वसामान्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज वाढवल्या जात आहेत. राज्यात पेट्रोलचा दर प्रती लिटर ८० रुपयांच्या वर गेला आहे तर डिझेल दर प्रती लिटर ७० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. राज्यात इंधनावर वॅटसह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत. पेट्रोल डिझेलवर दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरु आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे.