शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

बाजार समितीवर काँग्रेस-राकाँचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 12:20 AM

लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला.

लाखांदूर येथील निवडणूक : काँग्रेस-राकाँचे १२, भाजपा ६ तर अपक्ष १ जागेवर विजयी लाखांदूर : लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीवर झेंडा फडकविला. भारतीय जनता पार्टी समर्पित शेतकरी परिवर्तन पॅनेलला ६ जागांवर विजय मिळविता आला. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. १९ संचालकपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत ४६ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत सेवा सहकारी संस्था मतदार संघातील सर्वसाधारण जागेतून नरेश खरकाटे, विलास तिघरे, सुभाष राऊत, नरेश दिवठे, वामन बेदरे, तेजराम दिवठे, नरेश बेदरे हे विजयी झाले. याच मतदार संघातील महिला राखीव गटातून नीमा ठाकरे व उर्मिला राऊत या विजयी झाल्या. ईतर मागासवर्गीय राखीव जागेतून विजय फुंडे, विमुक्त भटक्या जाती जमाती मतदार गटातून गजानन दिघोरे हे विजयी झाले. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून संजय कोरे व देविदास राऊत हे विजयी झाले. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटकातून धनराज ढोरे, अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून सुनील भोवते, व्यापारी, अडत्या मतदार गटातून मुकेश भैय्या व गोपीचंद राऊत, हमाल (तोलारी) गटातून मनोज मेश्राम, विपणन व प्रक्रिया मतदार गटातून अपक्ष उमेदवार सुरेश ब्राम्हणकर हे विजयी झाले. भाजपने बाजार समितीची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपचे सहा प्रशासक बाजार समितीवर असताना या निवडणुकीत सत्ता स्थापन करण्याचे आटोकाट प्रयत्न करण्यात आले मात्र सहकार क्षेत्रातील मतदारांनी भाजपच्या मनसुब्यावर पाणी फेरले. काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होऊन एकत्रित निवडणूक लढविल्याने त्यांना बाजार समितीवर निर्विवाद सत्ता काबीज करता आली. यापूर्वी प्रशासक म्हणून काही काळ बाजार समितीचा कारभार सांभाळणारा भाजपा सत्ता स्थापन करण्यासाठी धडपड करीत असला तरी कांग्रेसचे पदाधिकारी व माजी आमदार सेवक वाघाये यांनी विजय मिळविला. कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, रमेश डोंगरे, प्रदीप बुराडे, तालुका अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, राष्ट्रवादीचे बालू चुन्ने यांच्या चमूने प्रयत्न करून सांघिक विजय मिळविला. निवडणूक निर्णय अधिकारी एस.जे हटवार, सहाय्यक निबंधक ए.के.मेंडूले यांनी कम पहिले तर पोलीस निरीक्षक देविदास भोयर यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. निकालाची घोषणा झाल्यावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. (शहर प्रतिनिधी)