नवोदयसाठी काँग्रेसचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 12:42 AM2018-08-19T00:42:33+5:302018-08-19T00:44:34+5:30
भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/शहापूर : भारत सरकार मानव संसाधन विकास मंत्रालयाचा प्रकल्प नवोदय विद्यालयास भंडारा जिल्ह्यात स्थायी जागा देण्यात यावी, यासह अन्य मागण्याकरिता नागपूर विद्यापीठ सीनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या पालकांनी ९ आॅगस्ट क्रांतीदिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
उपोषणाच्या दहाव्या दिवशी उपोषण सुरुच आहे. उपोषणकर्त्यांमध्ये भाऊ कातोरे, मंगेश वंजारी, दिनेश ठवकर व विलास मोथरकर यांचा समावेश आहे. भंडारा जिल्ह्याकरिता मिळालेले नवोदय विद्यालय जिल्ह्यातच राहावे. नवोदय विद्यालयाच्या स्थापनेचा हेतू पूर्ण होवून ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उंच भरारी घेता यावी. जिल्हाधिकारी यांना ठोस पाऊल उचलून नवोदय विद्यालयाचा गुंता सोडवावा. याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने भंडारा तालुका अध्यक्ष राजकुमार राऊत यांनी उपोषण मंडपाला भेट देवून पाठींबा जाहीर केला. गुरुवारला खासदार मधुकर कुकडे, माजी खासदार नाना पटोले यांनी भेट दिली. उपोषणाच्या दहाव्या दिवशीही उपोषणकर्त्यांना ठोस आश्वासन न मिळाल्यामुळे परिस्थती चिघळण्याची शक्यता आहे.