लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब, शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत. अपघात विमा योजनेत प्रवाशांकडून प्रत्येकी एक रूपया घेण्यात येत असून दररोज ६७ लक्ष प्रवाशांकडून तो जमा केला जात आहे. स्वामीनाथन आयोग लागू न करण्याचा निर्णय केंद्र शासनाने केली आहे. ईव्हीएम विरूद्ध राज्यात राण उठविण्यात येईल, असा इशारा काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.तुमसर येथे तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.१९७२ साली दुष्काळ पडला होता. तेव्हा तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी त्याचा सामना केला होता. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी भाजप प्रणीत सरकारने नाकारल्या. उलट जीएसटी जुलमी कायदा आणला, उद्योगपतींना त्याचा फायदा होत आहे. केंद्रीय अंदाजपत्रक गोंधळात मंजूर करवून घेतला. यात मनी बिल मंजूर करण्यात आले. चर्चा करू दिली नाही. पंतप्रधान फसल विमा योजना फसवी असून राज्य सरकारने सुरू केलेली बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेतून दरदिवशी ६७ लाख रूपये एसटी प्रवाशांकडून जमा केले जात आहे.जागतिक बँकेने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात भारतात गरीबी नाही, असा अहवाल दिला आहे. उज्वला गॅस योजना खेड्यापाड्यात यशस्वी झाली नाही. उलट त्यामुळे गरीब श्रीमंताच्या यादीत आले. मोदी सरकारने ११ अरब ९८ कोटी रूपये प्रसार व प्रचारावर खर्च केले. पुढील महिन्यात होत असलेली कॉलेजच्या निवडणूका काँग्रेस पक्षाची युवा संघटना लढणार आहे. त्याकरिता तयारीचे निर्देश माजी खासदार नाना पटोले यांनी दिले.याप्रसंगी नाना पटोले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. प्रदेश महिला महासचिव कुंदा वैद्य तथा स्थानिक महिला काँग्रेस, सेवादल कार्यकर्त्यांची नियुक्तीपत्र नाना पटोले यांनी दिले.व्यासपीठावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते अरविंद कारेमोरे, नारायणराव तितिरमारे, जि.प. माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा भुरे, शहराध्यक्ष अमरनाथ रगडे, युवा नेते डॉ. पंकज कारेमोरे, काँगे्रस सेवादलचे जिल्हाध्यक्ष विनोद भगत, के.के. पंचबुद्धे, तालुकाध्यक्ष शंकर राऊत, निरज गौर, कान्हा बावनकर, प्रफुल्ल बिसने, शुभम गभने, चैनलाल मसरके, विपीन कुंभारे, कमलाकर निखाडे, खुशाल पुष्पतोडे, स्रेहल रोडगे, भोले, कांबळे, अमीत लांजेवार. संचालन व आभार नगरसेवक बाळा ठाकूर यांनी मानले. बैठकीला शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.चमकोगिरी करणाऱ्यांना संधी नाहीकाँग्रेस पक्षात केवळ चमकोगीरी करणाऱ्यांना किंमत दिली जाणार नाही. संघटनेचे काम, सर्वसामान्यांची कामे घेवून रस्त्यावर उतरण्याचा सल्ला नाना पटोले यांनी दिला. कामे करणाºयांनाच संधी मिळेल असे त्यांनी सांगितले. आठ दिवसात विविध विषयावर आंदोलन स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
ईव्हीएम विरोधात काँग्रेस आंदोलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:24 PM
काँग्रेसने राबविलेल्या आर्थिक धोरणामुळे देश उभा झाला आहे. राज्यावर पूर्वी दीड लाख कोटींचे कर्ज होते. ते सध्या सहा लाख कोटींवर गेले आहे. जीएसटीमुळे उद्योगपतींचा फायदा झाला तर गरीब, शेतकरी, लहान व्यापारी हवालदिल झाले आहेत.
ठळक मुद्देनाना पटोले : तुमसर येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक