भंडारा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा यांच्या वतीने भंडारा जिल्ह्यात १३ गावात संविधान बांधिलकी सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) भंडारा जिल्हा प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले यांच्या नेतृत्वात संविधान बांधिलकी महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तुमसर तालुक्यातील सिहोरा येथून संविधान बांधिलकी महोत्सव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सिहोरा येथे बसस्थानकासमोर जाहीर कार्यक्रम करण्यात आले. समाजात जादूटोण्याच्या नावावर होत असलेली विषमता दूर करण्याचे आवाहन केले. हरदोली या गावातील स माजभवनात संविधान बांधिलकी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील भिकारखेडा, लाखांदूर तालक्यातील मासळ, विरली, पवनी तालुक्यातील आसगाव, मोहर्ली, लाखनी तालुक्यातील पोहरा, पिंपळगाव, साकोली तालुक्यातील वडद, विर्सी, भंडारा तालुक्यातील आंबाडी, लहान गराडा तसेच भंडारा शहरात संविधान बांधिलकीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अंनिसच्या अश्विनी भिवगडे, त्रिवेणी वासनिक, आशा गजभिये, नरहरी नागलवाडे, प्रमोद येल्लजवार उपस्थित होते. प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते. महोत्सवासाठी बार्टीचे समाजदूत दिनेश ठवकर, विद्या मेश्राम, चंद्रकांत मेश्राम, सुलभा कुंभलकर, शैलेश हुमणे, अर्चना चवरे, सुषमा घरडे, अल्का तलमले, सचिन नवघरे, कांचन राजगिरे, प्रसन्ना गणवीर, उद्धव निखारे, प्रज्ञा दिरबुडे, सुनिता गेडाम यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)
संविधान बांधिलकी सप्ताह
By admin | Published: February 04, 2016 12:39 AM