लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : चारशे चाळीस रूपये खर्चून गभने सभागृह ते रेल्वे फाटकापर्यंत सिमेंट रस्त्याचे अजूनपर्यंत संपूर्ण कामे होणे शिल्लक असताना रस्त्यावर लावलेले 'पेव्हर ब्लॉक' पुर्णत: उखडू लागले आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय निर्माण झाले आहे.सिमेंट रस्ता बांधकामाला वर्षपुर्ती होण्याकरिता १७ ते १८ दिवसाचाच कालावधी शिल्लक राहिलेला आहे. परंतू अजुनपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झालेच नाही. ज्या पोटतिडकीने ऐन पावसाळ्यात रस्ता बांधकामाला सुरवात करण्यात आली असे वाटले होते. तीन महिन्यात पूर्ण बांधकाम होणार अशी शक्यता होती. मात्र माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक संपूर्ण रस्ता ओरबाडून काम सुरू असल्याचे दाखविण्यात आले. अगदी कासवाच्या गतीनेही कमी गतीने काम करण्यात आल्याने तुमसरकरांना कमालीच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या आहेत.दरम्यान दिवाळी सणापुर्वी एकेरी मार्ग सुरू करण्यात आला. दुहेरी मार्गाचे सिमेंटीकरण करताना मात्र तितका काळ न लावता सपाट्यात काम सुरू करून संपूर्ण गुणवत्ता धाब्यावर बसवून कुठे उंच तर कुठे खाल, असे सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले.त्या मार्गात लक्षावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याची ओरडही तुमसरकरांनी केली होती. मात्र त्यांच्या विरोधालाही न जुमानता कंत्राटदाराने त्याच शैली रस्त्याचे बांधकाम केले. रस्त्यात ठिकठिकाणी एकदम निकृष्ठ दर्जाचे 'पेव्हर ब्लॉक' लावण्यात आले. बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्याने बांधकामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे सिमेंट रस्त्याचे पूर्ण काम होण्याआधीच पेव्हर ब्लॉक उखडू लागल्याने त्या ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.परिणामी रस्त्यावरून दुचाकी नेताना गाडी अनियंत्रित होवून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.रस्त्यावर निकृष्ठ दर्जाचे पेव्हर ब्लॉक लावल्यामुळे त्यावरून जड वाहने जातात. पेव्हर ब्लॉक तुटून खड्डे पडत आहेत. विशेष म्हणजे याच रस्त्यावरून शासनाचे अधिकारी व पदाधिकारी जात असताना त्यांनी गांधारीची भूमिका घेतली आहे.-प्रमोद तितिरमारे, प्रदेश सचिव, काँग्रेस पक्ष.
पूर्ण रस्ता बांधकामापूर्वी 'पेव्हर ब्लॉक' उखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:24 PM
चारशे चाळीस रूपये खर्चून गभने सभागृह ते रेल्वे फाटकापर्यंत सिमेंट रस्त्याचे अजूनपर्यंत संपूर्ण कामे होणे शिल्लक असताना रस्त्यावर लावलेले 'पेव्हर ब्लॉक' पुर्णत: उखडू लागले आहे. त्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर संशय निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : गुणवत्तेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष